ETV Bharat / state

बुलेटस्वाराला पैसे पडले सांगत भामट्यांनी पळवली 2 लाखाची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद - two wheller

भिवंडी शहरातील भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर हे सिमेंट व्यावसायिक आहेत. त्यांचे मीठपाडा खोणी येथे सिमेंट विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला दुकान बंद करून ते प्रभुआळी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आपल्या खात्यातून २ लाख २१ हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर निघाले.

व्यावसायिकाला लुबाडले
author img

By

Published : Jun 7, 2019, 8:07 PM IST

ठाणे - बँकेतून २ लाख २१ हजार रुपयांची रोकड काढून बुलेटवरून घरी घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला भामट्यांनी लुबाडल्याची घटना समोर आली आहे. दुचाकीवरून आलेल्या २ भामट्यांनी त्या व्यावसायिकाला तुमचे पैसे मागे पडले, अशी थाप मारली. यामुळे बुलेटवरून खाली उतरून पैसे कुठे पडले. हे पाहण्यासाठी काही अंतरावर जाताच दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी बुलेटला टांगून ठेवलेली पैशाची पिशवी पळवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

व्यावसायिकाला लुबाडले

भिवंडी शहरातील भाजप उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर हे सिमेंट व्यावसायिक आहेत. त्यांचे मीठपाडा खोणी येथे सिमेंट विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला दुकान बंद करून ते प्रभुआळी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आपल्या खात्यातून २ लाख २१ हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर निघाले. त्यावेळी आदर्श पार्क येथील रस्त्यावर त्यांच्या मागे बँकेतून पाळतीवर असलेल्या २ बाईकवरील चार भामट्यापैकी एका बाईकवरील दोघांनी त्यांना गाठत तुमचे मागे पैसे पडल्याचे सांगितल्याने. तत्काळ त्यांनी आपली बुलेट थांबवत रोकडची पिशवी तशीच बुलेटला अडकवून पडलेले पैसे पाहण्यासाठी माघारी चालत येत असतानाच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या बाईकवरील दोघा जणांनी लगेच त्यांच्या बुलेटला अडकवलेली रोकडची पिशवी घेऊन पळून गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निलेश कोंडलेकर यांनी तत्काळ निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणाऱ्या ४ भामट्यांविरोधात तक्रार दाखल केली. आदर्श पार्क इमारतीच्या गेटवरील सीसीटीव्हीत ही संपूर्ण चोरीची घटना कैद झाली आहे. पोलीस त्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

बुलेटस्वाराला पैसे पडल्याची थाप मारून भामट्यांनी पळवली 2 लाख 21 हजार रुपयांची रोकड; घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे :- भिवंडी शहरातील आदर्शपार्क येथे बॅकेतुन 2 लाख 21 हजार रुपयांची रोकड काढून बुलेटवर  पिशवीतून घरी घेऊन जाणाऱ्या व्यावसायिकाला भामट्यांनी लुबाडल्याची घटना समोर आली आहे.

विशेष म्हणजे दुचाकीवरून आलेल्या दोन भामट्यांनी तुमचे पैसे मागे पडले अशी थाप मारली. यामुळे बुलेटवरून खाली उतरून पैसे कुठे पडले. हे पाहण्यासाठी काही अंतरावर जाताच दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी बुलेटला टांगून ठेवलेली २ लाख २१ हजार रुपयांची पिशवी पळवली.  या घटनेचा प्रकार नजीकच्या इमारतीच्या गेटवरील एका सीसीटीव्हीत कैद झाली आहे.  

 भिवंडी शहरातील भाजपा उत्तर मंडळ अध्यक्ष निलेश कोंडलेकर हे सिमेंट व्यासायिक असून त्यांचे मीठपाडा खोणी येथे सिमेंट विक्रीचे दुकान आहे. आज दुपारच्या सुमाराला  दुकान बंद करून ते प्रभुआळी येथील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत जाऊन आपल्या खात्यातून 2 लाख 21 हजार रुपयांची रक्कम काढून बाहेर निघाले. त्यावेळी  आदर्श पार्क येथील रस्त्यावर त्यांच्या मागे बँकेतून पाळतीवर असलेल्या दोन बाईक वरील चार भामट्यापैकी एका बाईक वरील दोघांनी त्यांना गाठत तुमचे मागे पैसे पडल्याचे सांगितल्याने त्यांनी तात्काळ आपली बुलेट थांबवित रोकडची पिशवी तशीच बुलेटला अडकवून मागे रस्त्यावर आपले काही पैसे पडले असल्याचे पाहण्यासाठी माघारी चालत येत असतानाच दबा धरून बसलेल्या दुसऱ्या बाईक वरील दोघा जणांनी लागलिच त्यांच्या बुलेटला अडकवलेली रोकडची पिशवी घेऊन पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निलेश कोंडलेकर यांनी तात्काळ निजामपुरा पोलीस ठाण्यात धाव घेत फसवणूक करणाऱ्या  चार भामट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. आदर्श पार्क इमारतीच्या गेटवरील सीसीटीव्हीत ही  संपूर्ण चोरीची घटना कैद झाली आहे. पोलीस त्या आधारे फरार आरोपींचा शोध घेत आहेत.  

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.