ETV Bharat / state

कामोठेमध्ये अफवा पसरवणाऱ्या दोघांवरुद्ध गुन्हा दाखल

या प्रकरणी अमोल शितोळे आणि गणेश शिंदे या आरोपींवर कामोठे पोलीस ठाण्यात भा. दं.विच्या कलम ५०५ (१) (ब), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ५४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

kamothe police thane
कामोठे पोलीस ठाणे
author img

By

Published : Apr 30, 2020, 5:02 PM IST

ठाणे - व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून अफवा पसरवून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी कामोठे पोलिसांनी दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपींना नोटीस देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अमोल शितोळे आणि गणेश शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामोठेमध्ये राहणारे आणि एकता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी व त्यांचे सहकारी मित्र गणेश शिंदे यांनी व्हॉट्सअ‌ॅपच्या माध्यमातून 'आम्ही कामोठेकर' या ग्रुपवर ३० एप्रिल ते ३ मेपर्यंत कामोठे परिसर बंद असल्याचा खोटा संदेश पसरवला होता. याबाबत महाराष्ट्र शासनाने कोणतीही अधिसूचना जाहीर केली नव्हती. मात्र, शितोळे यांच्या अफवेमुळे कामोठे वसाहतीमधील नागरिक भयभीत होऊन भाजीपाला तसेच अन्य वस्तू खरेदी करण्यासाठी रस्त्यावर उतरून गर्दी केली होती. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंगचे आणि कोरोनाच्या अटकाव करण्यासाठी शासनाने दिलेल्या आदेशांचे तीन तेरा झाले होते.

या प्रकरणी अमोल शितोळे आणि गणेश शिंदे या आरोपींवर कामोठे पोलीस ठाण्यात कलम ५०५ (१) (ब), तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००चे कलम ६६सह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५चे कलम ५४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब तुपे हे अधिक तपास करत आहे.

हेही वाचा- एकनाथ शिंदेंकडून पोलिसांना मदत, मुक्या प्राण्यांसाठीही पुरवले अन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.