ETV Bharat / state

ठाण्यात बिबट्याची कातडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक - बिबट्याची कातडी तस्करी

उल्हासनगर येथे दोघा तस्करांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. या दोघा आरोपींकडून २० लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली आहे.

जप्त केलेली बिबट्याची कातडी
author img

By

Published : Oct 2, 2019, 7:29 PM IST

ठाणे - बिबट्याची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली. दोघा आरोपींकडून २० लाख रुपये किमतीची कातडी जप्त केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर येथे २० लाख रुपये किमतीची बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली

संतोष हंगारगे (जालना) व प्रकाश वाटूडे (परभणी) अशी अटकेत केलेल्या तस्करांची नावे आहेत. उल्हासनगर येथील शहाड ब्रिजजवळ २ व्यक्ती बिबट्याची कातडी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचला. दोन व्यक्ती संशयितरीत्या शहाड ब्रिजजवळ फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता पिशवीत बिबटयाची सुकलेली कातडी मिळाली.

हेही वाचा - गांधी जयंतीनिमित्त ठाण्यात चिमुकले गांधी दिसले रस्त्यावर

ही कातडी त्यांनी कुठून आणली व कोणाला विकणार होते, याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:kit 319Body:२० लाखांचे बिबटयाच्या कातड्यासह तस्करी करणाऱ्या दुकलीवर झडप

ठाणे : बिबट्याची २० लाख रुपये किमतीची कातडी विक्री करण्यासाठी आलेल्या दोघा तस्करांना उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष हंगारगे व प्रकाश वाटूडे अशी अटकेत असलेल्या तस्करांची नावे आहेत. हे दोघेही तस्कर जालना व परभणी येथे राहणारे आहेत.

उल्हासनगर कॅम्प नंबर १ येथील शहाड ब्रिज जवळ २ इसम बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती उल्हासनगर गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचला. दोन इसम संशयितरित्य त्या ठिकाणी फिरत असतानाच पोलिसांनी त्यांना झडप घालून ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये बिबटया या वन्यजीव प्राण्याचे सालून काढलेले कडक व सुकलेले कातडे मिळून आले. ताब्यात घेतलेल्या हे दोघेही जालना व परभणी येथील राहणारे आहेत. ते बिबटयाचे कातडे विक्री करण्यासाठी उल्हासनगरात आले होते. हे कातडे त्यांनी कुठून आणले व कोणाला विकणार होते. याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
या प्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात संतोष व प्रकाश या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता ५ ऑकटोबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक .तोरगल करीत आहेत.

बाईट / महेश तरडे (पोलीस निरीक्षक)

Conclusion:ulhasnagar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.