ETV Bharat / state

कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यात 2 हजार 596 मनसैनिकांवर झडप व सुटका;10 मनसेच्या पदाधिकाऱ्याना जिल्हाबंदी - कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यात 2 हजार 596 मनसैनिकांना सुटका

कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणे २, कोळसेवाडी पोलीस ठाणे ३, खडकपाडा पोलीस ठाणे ८, डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे ४, टिळकनगर पोलीस ठाणे ४, मानपाडा पोलीस ठाणे ५ आणि विष्णूनगर पोलीस ठाणे ३ असे एकूण २९ मनसैनिकांना ताब्यात घेतले आहेत..तर कल्याण न्यायालयाच्या आदेशाने कल्याण डोंबिवलीतील 10 मनसेच्या पदाधिकाऱ्याना जिल्हाबंदी केली आहे.

two and a half thousand mns party workers were arrested and 10 leader were banned  in kalyan dombivali district
कल्याण डोंबिवलीसह जिल्ह्यात 2 हजार 596 मनसैनिकांवर झडप व सुटका
author img

By

Published : May 4, 2022, 9:48 PM IST

ठाणे - मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवा आणि अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांचा आवाज न्यायालयाच्या आदेशानुसार ठरविलेल्या डेसिबलमध्ये असावा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील जाहीर सभेत सांगितले. न्यायालयाच्या नियमांचे पालन करणाऱ्या मशिदीसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचे पठण करू असा इशारा दिला होता. ४ मे पासून मनसैनिक हनुमान चालिसा पठन करतील, असे जाहीर करताच राज्य सरकारने मनसैनिकांना नोटीस बजावल्या. मनसेचे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांसह जिल्ह्यातील २ हजार ५९६ मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावल्या. विशेष म्हणजे बुधवारी पोलिसांनी मनसेची ताकत असलेल्या एकट्या कल्याण-डोंबिवलीतील ३९ जणांना ताब्यात घेऊन त्यांची काही अटी व शर्थीनुसार आज सांयकाळी सुटका करण्यात आली आहे.

10 मनसेच्या पदाधिकाऱ्याना जिल्हाबंदी - मनाई आदेश लागू झाल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते असल्याने अप्रत्यक्ष विना परवानगी एकत्र जमुन व गर्दी हाईल असे कार्यक्रमाचे आयेजन करू नये तयेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखवतील असे कोणतेही कृत्य करू नये. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे नोटीसमध्ये नमूद केले होते. कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाणे २, कोळसेवाडी पोलीस ठाणे ३, खडकपाडा पोलीस ठाणे ८, डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे ४, टिळकनगर पोलीस ठाणे ४, मानपाडा पोलीस ठाणे ५ आणि विष्णूनगर पोलीस ठाणे ३ असे एकूण २९ मनसैनिकांना ताब्यात घेतले आहेत..तर कल्याण न्यायालयाच्या आदेशाने कल्याण डोंबिवलीतील 10 मनसेच्या पदाधिकाऱ्याना जिल्हाबंदी केली आहे.

२७ जून पर्यंत जिल्हा जमावबंदी - महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासुन मशिदीवरील भोंगे काढुन टाकणेबाबत चेतावणी दिली आहे. तसे न केल्यास अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीस पठण करण्याचे आवाहन केले होते. याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ज्या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु करण्यात आला आहे. सदर मनाई आदेशामध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीरसभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई केली आहे. पोलीस उप आयुक्त विशेष शाखा ठाणे यांनी २८ एप्रिल अन्वये फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३चे कलम १४४ नुसार दिनांक २९ एप्रिल सकाळीपासुन ते दिनांक २७ जून पर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागु केला आहे. मानई आदेशात कोणत्याही धार्मिक स्थळा पासुन २०० मीटर परिसरात सार्वजनिक रितीने बेकायदेशिर जमाव करणे, घोषणावाजी करणे, नाच-गायन करणे, वाद्य बडवने, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, रॅली, मिरवणुक तसेच सभा घेणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त - उल्हासनगर मनसेचे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांच्यासह १३ प्रमुख पदाधिकारी शिवाय अंबरनाथ व बदलापूरमध्येही मनसेचे पदाधिकाऱ्यावर पोलिसांनी नोटीस बजावून कार्यवाही केली आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील ३५ पोलीस ठाण्यात अंतर्गत ३५० पोलीस अधिकारी, ७ हजार ५०० पोलीस कर्मचारी, ९ एसआरपीएफ, प्लाटून ३०० होमगार्ड ठिकठिकाणच्या धार्मिकस्थळासह संवदेशील भागात तैनात करण्यात आल्याची माहिती सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा ) सरदार पाटील यांनी एका प्रसिद्धपत्रकाद्वारे दिली आहे.

भोगांच्या आवाज पुन्हा वाढला तर - राज्यात कायदा फाट्यावर मारणारे सरकार आहे का ? याबाबत मनसेचे माजी शहर अध्यक्ष मनोज घरत यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करा आणि अनधिकृत मशिदीवरील भोंगे पोलिसांनी उतरवावे, हेच तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. यात पोलीस मनसैनिकांची धरपकड करत असतील आता कायद्याचे राज्य आहे तरी कुठे ? ते राहिलेच नाही असे खेदाने म्हणावे लागेल. हे सरकार मनसैनिकांचे खच्चीकरण करण्याचा जो प्रयत्न करत आहे, तो प्रयत्न सफल होणार नाही. सरकारने त्याचे काम केले नाही तर मनसे हनुमान चालीसा पठन करणारच, असल्याचे घरत यांनी सुस्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.