ETV Bharat / state

महिलेच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला रिवॉल्वर पुरवणारे दोन आरोपी गजाआड - महिलेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपी अटकेत

कल्याण पश्चिम परिसरातील सापर्डे गावात 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमाराला एका लग्नाचा हळदी समारंभ सुरू असताना एका महिलेचे अनैतिक संबंध आणि लुटीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपास निष्पन्न झाले होते. आता या प्रकरणातील पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी पवन मात्रे याला पिस्टल पुरवणाऱ्या जयेश जाधव आणि अजय पवार अशा या दोघांना खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

woman's murder case
woman's murder case
author img

By

Published : Mar 5, 2021, 9:37 PM IST

Updated : Mar 5, 2021, 9:44 PM IST

कल्याण (ठाणे) - कल्याण पश्चिम परिसरातील सापर्डे गावात 22 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमाराला एका लग्नाचा हळदी समारंभ सुरू असताना एका महिलेचे अनैतिक संबंध आणि लुटीच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपास निष्पन्न झाले होते. विशेष म्हणजे मुख्य आरोपी आणि सुरुवातीला तपास दरम्यान वारंवार पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत या हत्येचा गुंता सोडवला. या आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी साशा या पोलिसांच्या श्वानाने देखील मदत केली होती. आता या प्रकरणातील पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी पवन मात्रे याला पिस्टल पुरवणाऱ्या जयेश जाधव आणि अजय पवार अशा या दोघांना खडकपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधिकारी
हळदी कार्यक्रमाच्या बहाण्याने घरात नेऊन हत्या..

कल्याण पश्चिम परिसरातील सापर्डे गावात 22 फेब्रुवारी रोजी एका महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तर दुसरी महिला गोळीबारात गंभीर जखमी झाली होती. पोलिसांच्या तपासात मुख्य आरोपी पवन याने सुवर्णा गोडे या महिलेचा गोळीबार करून खून केला होता. पोलिसांनी त्याच वेळी त्याला ताब्यात घेतले होते. खळबळजनक बाब म्हणजे आरोपीचे संबंधित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यातूनच हा प्रकार घडला असून विशेष म्हणजे गोळीबार करताना झटापट होऊन आरोपीची आई ही गंभीर जखमी झाली होती. मात्र सुरुवातीला आरोपीने पोलिसांची दिशाभूल करून घरात दरोडेखोर घुसून दागिने लुटल्याचा बनाव त्यांनी पोलिसांसमोर केला होता. त्यामुळे पोलिसांच्या तपासात या वेगळे वळण मिळाले होते. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपी पवन यानेच लुटीच्या उद्देशाने सुवर्णा गोडे तिला हळदीच्या कार्यक्रमाच्या दिवशी रात्री घरी बहाण्याने बोलवून तिच्यावर गावठी पिस्टलमधून गोळीबार केला. या गोळीबारात ती जागीच ठार झाली. त्यानंतर तिच्या गळ्यातील 6 लाख 80 हजार रुपये किमतीचे दागिने काढून घेत ते स्वतःच्या घरात लपून ठेवले तसेच हा प्रकार पाहिल्यामुळे त्याने स्वतःच्या आईवर देखील गोळी झाडून तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं होतं.

25 हजार रुपयाला विकत घेतलं होतं पिस्टल -

मुख्य आरोपी पवन हा सराईत गुन्हेगार सारखा वागणारा होता. त्याने कल्याण तालुक्यातील नेवाळी येथील आरोपी जयेश जाधव यांच्या ओळखीने मध्यप्रदेश मधील अजय पवार यांनी आणलेले गावठी पिस्टल 25 हजार रुपयात खरेदी केले होते. त्यामुळे पोलिसांनी या दोघाही आरोपींना बेड्या ठोकले आहेत. सदर गुन्ह्यातील कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार, सपोनि धर्मेंद्र आवारे पोलीस उपनिरीक्षक योगेश गायकर अनिल पंडित व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Last Updated : Mar 5, 2021, 9:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.