ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महार्गावरील हॉटेलसमोर ट्रक चालकाची चाकूने वार करुन हत्या - truck driver killed with stabbed by unknown person

मुंबई-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलसमोरच ट्रक चालकाची शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास चाकूने वार करुन अज्ञाताने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हाॅटेल साहारा समोर घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Sep 25, 2021, 5:16 AM IST

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावरील एका हॉटेलसमोरच ट्रक चालकाची शुक्रवारी (दि. 24 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास चाकूने वार करुन अज्ञाताने हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हाॅटेल साहारा समोर घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. राजेंद भगवान कदम (वय 33 वर्षे, रा. बानगाव, ता. नादगाव, जि. नाशिक), असे हत्या झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.

जेवणासाठी थांबला होता

मृत ट्रक चालक राजेंद्र हा शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हाॅटेल साहारामध्ये रात्रीच्या सुमारास जेवण करण्यासाठी आला होता. जेवण झाल्यानंतर पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या ट्रक (क्र. एम एच 04 एफ डी 4681) जवळ जात असतानाच अज्ञात व्यक्तीने चालकावर चाकूचे वार करून त्याची निर्घृण हत्या केली. तर हत्या करून फरार झालेल्या आरोपीच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

हत्येचे कारण गुलदस्त्यात

घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस पथक घटनस्थळी दाखल होऊन पंचनामा करत ट्रक चालकाचा मृतदेह शहापूरच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला आहे. मात्र, या चालकाच्या हत्येमागचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी शहापूर पोलीस तपास करत आहे. मात्र, महामार्गावरील होत आलेल्या चोऱ्या-माऱ्या, खून, लुटमारी अशा गंभीर गुन्ह्यांत टाळेबंदीननंतर कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा - महिलांवरील अत्याचाराला सरकारसह गृह विभाग जबाबदार - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.