ETV Bharat / state

भिवंडीतील जंगलात आदिवासी महिलेची हत्या; परिसरात खळबळ - भिवंडी जंगल बातमी

जंगलात गेलेल्या एका आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे.

bhiwandi police
भिवंडी पोलीस स्टेशन
author img

By

Published : Mar 19, 2021, 7:21 PM IST

Updated : Mar 19, 2021, 7:34 PM IST

ठाणे - जंगलात गेलेल्या एका आदिवासी महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील शेलार गावच्या हद्दीत असलेल्या एका जंगलात घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सुशीला दिघे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे.

मृत महिलेचा पती जीवन दिघे

बकऱ्या चरण्यासाठी गेली होती जंगलात

भिवंडी तालुक्यातील काटई ग्राम पंचायत हद्दीतील डोंगरपाडा मांगत पाडा मृतक आदिवासी महिला पतीसह राहत होती. गुरुवारी सायंकाळी घरातील बकऱ्या चरण्यासाठी घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेलार गावाजवळील जोगमोरी या जंगल परिसरात गेली होती. मात्र मृत महिला रात्री उशिरापर्यंत घरी परतली नसल्याने नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्रीच्या सुमारास महिलेचा मृतदेह नातेवाईकांना शेलार हद्दीतील जंगलात आढळला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - एनआयएच्या अहवालानंतर दोषींवर कारवाई; शरद पवारांच्या भेटीनंतर अनिल देशमुखांचे स्पष्टीकरण

संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी

आज सकाळी तालुका पोलीस ठाण्यात या महिलेच्या मृत्यूची नोंद आकस्मित निधन म्हणून करण्यात येत असतांना महिलेच्या नातेवाईकांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा सखोल तपास करण्याचा आग्रह तालुका पोलिसांकडे धरला असता अखेर शुक्रवारी सायंकाळी या महिलेच्या हत्येची नोंद भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात करण्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे.

अत्याचार करून हत्या केल्याचा संशय

भिवंडी तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह पंचनामा करून ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. मात्र घटनास्थळी मृत महिलेचे अंतवस्त्र व ओढणी आढळून आली असून अंगावरचे दागीने व मोबाईल आढळून आला नसल्याने त्यामुळे महिलेवर शारिरीक अत्याचार करून सदर महिलेची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

१८ तासानंतरही कुटुंबीयांनी मृतदेह घेतला नाही ताब्यात

घटनेच्या १८ तासा नंतरही कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला नसून आपल्या पत्नीच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी मृत महिलेचा पती जीवन दिघे याने केली आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक , उपअधीक्षक तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात भेट दिली आहे.

हेही वाचा - इन्स्टाग्रामवर लहान मुलांनाही काढता येणार अकाउंट; फेसबुककडून सुरू आहे काम

Last Updated : Mar 19, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.