ETV Bharat / state

ठाण्यात मुजोर टॅक्सीचालकाला वाहतूक पोलिसांचा 'प्रसाद'

वाहतूक पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, ठाणे स्थानकाच्याबाहेरील वाहतूक पोलिसांची चौकी दुसरीकडे सुरू करण्यात आल्यामुळे वाहतूक पोलीस नसले की या रिक्षा आणि टॅक्सीचालकांची मुजोरी वाढते. त्यामुळे याचा फटका प्रवाशांना बसतो.

ठाणे
author img

By

Published : Jun 19, 2019, 12:22 PM IST

Updated : Jun 19, 2019, 12:41 PM IST

ठाणे - पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील रिक्षा आणि टॅक्सीचालकांच्या मुजोरीचा त्रास आता ठाणेकरांसह पोलिसांनादेखील होऊ लागला आहे. असाच एक प्रकार आज सकाळी सॅटिस उड्डाण पुलाखाली घडला. एक टॅक्सीचालक थेट उड्डाण पुलाखाली टॅक्सी लावून रेल्वे स्थानकात भाडे घेण्यास गेला. ज्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळी असलेल्या वाहतूक पोलिसांनी टॅक्सीचालकाला गाडी काढण्यास सांगितले असता तो पोलिसांनाच उलट सुलट उत्तर देऊ लागला. हा प्रकार रोजच होत असल्याचे समजताच वाहतूक पोलिसांचा बांध फुटला. त्या मुजोर टॅक्सीचालकाला पोलिसांनी चोप दिला.

ठाण्यात मुजोर टॅक्सीचालकाला पोलिसांचा 'प्रसाद'

हा मुजोरपणा रोज होत असल्याचे समजताच वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा पारा चढला आणि त्यांनी त्या टॅक्सीचालकाला चांगलाच चोप दिला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांनाच टार्गेट करण्यात येत होते. मात्र, जेव्हा खरी कहाणी समोर आली तेव्हा मात्र पोलिसांचे कौतुक होऊ लागले.

सॅटीस उड्डाण पुलाखाली रिक्षा आणि टॅक्सी रांगेशिवाय लावण्यास मनाई असतानाही सर्रास रिक्षा, टॅक्सी लावल्या जातात. त्यामुळे याचा त्रास पोलिसांसह ठाणेकरांनाही मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच आज वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा बांध तुटला आणि टॅक्सीचालकाला चांगलाच प्रसाद मिळाला. स्थानकाबाहेर अवैध रिक्षावाले भाडे भरतात आणि नंतर प्रवाशांकडून अतिरिक्त भाडे घेतात किंवा त्यांना लूटतातही. पोलीस वारंवार आवाहन करून देखील प्रवासी मात्र अशा अवैध वाहनांतूनच प्रवास करतात.

Intro:मुजोर रिक्षाचालकाला पोलिसांचा प्रसाद ठाणे स्थानकातील प्रकार प्रवाश्यानी केली कायम स्वरूपी वाहतूक पोलिसांची मागणीBody: ठाणे पश्चिम रेल्वे स्थानका बाहेरील सॅटीस उड्डाण पुलाच्या खाली रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुजोरीचा त्रास आता ठाणे करांसह पोलिसांना देखील होऊ लागला आहे या रिक्षा टॅक्सी वाल्यांची आता इतकी मुजोरी वाढलीये की हे रिक्षा टॅक्सी चालक पोलिसांना देखील जुमानत नाहीत. असाच एक प्रकार आज सकाळी सॅटिस उड्डाण पुलाच्या खाली समोर आला.एक टॅक्सी चालक थेट उड्डाण पुलाच्या खाली टॅक्सी लावून रेल्वे स्थानकावर भाडं घेण्यास गेला ज्यामुळे उड्डाण पुलाखाली वाहतूक कोंडी झाली . घटनास्थळी असलेले वरीष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी यांनी त्या टॅक्सी चालकाला गाडी काढण्यास सांगितले असता तो टॅक्सी चालक पोलिसांना उलट सुलट उत्तर देऊ लागला हा प्रकार रोज घडत असल्याने वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा बांध तुटला आणि त्यांनी त्या टॅक्सी चालकाला चोप दिला. हा व्हिडिओ पोलिसांवर दबाव बनवण्यात आला मात्र जेव्हा खरी कहाणी समोर आली तेव्हा मात्र पोलीसांचे कौतुक होवू लागले .सॅटीस उड्डाण पुलाखाली रिक्षा आणि टॅक्सी रांगेशिवाय लावण्यास मनाई असतानाही सर्रास रिक्षा टॅक्सी लावल्या जातात आणि पोलिसांसह ठाणेकरांना ही याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच आज वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांचा बांध तुटला आणि टॅक्सी चालकाला चोप मिळाला . स्थानका बाहेर अवैध रिक्षा वाले भाडं भरतात आणि पुढे जाऊन अज्ञात स्थळी प्रवाशांकडून अतिरिक्त भाड घेतात किंवा त्यांना लूटतातही पोलिस वारंवार आव्हान करुन देखील प्रवासी मात्र अशा अवैध वाहनांतून प्रवास करतात आणि बळी पडतात.
वाहतुक पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे मात्र ठाणे स्थानकाच्या बाहेर असलेली वाहतूक पोलिसांनी चौकी दुसरीकडे सुरू करण्यात आली आहे त्यामुळे वाहतूक पोलीस नसले की या रिक्षा आणि टेकसी चालकांची मुजोरी वाढते आणि त्याचा फटका प्रवाश्यांना बसतोConclusion:
Last Updated : Jun 19, 2019, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.