ETV Bharat / state

उल्हासनगरमध्ये बंटी-बबलीच्या जोडीचा व्यापाराला ३ लाखांचा चुना, आरोपी जोडी अटकेत

ठाण्यातील उल्हासनगर येथे एका जोडीने व्यापाऱ्याला १०० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन त्याच्याकडून ३ लाख रुपयांची रोकड घेतली होती.

author img

By

Published : Mar 3, 2020, 11:44 AM IST

Vitthalwadi Police Station Thane
विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन ठाणे

ठाणे - उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅम्प परिसरात एका जोडीने व्यापाऱ्याला १०० ग्रॅम वजनाचे बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन त्याच्याकडून ३ लाख रुपये उकळले होते. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी या जोडीला अटक केली. उदयभान पांडे (६२) व नेहा इंद्रिस (२९) असे अटक करण्यात आलेल्या जोडीचे नाव आहे.

हेही वाचा... खळबळजनक! प्रेयसीवर भर रस्त्यात चाकूने वार करून प्रियकराचा स्वतःच्या गळ्यावर वार

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात त्रिमूर्ती केमिस्ट अ‌ॅण्ड ड्रगिस्ट नावाचे एक मेडीकलचे दुकान आहे. त्या दुकानात नरेंद्र वारूळे (५१) हे बसले असताना त्यांच्या तोंड ओळखीचा आरोपी उदयभान पांडे व त्याच्यासोबत एक महिला आली होती. त्यावेळी आरोपींनी १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आपल्याजवळ असल्याचे सांगत, या बिस्कीटच्या मोबदल्यात ३ लाख रूपये द्या, असे वारूळेंना सांगितले. वारूळे यांनी ते 3 लाख रुपये देऊन बिस्कीट खरेदी केले. त्यानंतर ते दोघेही तेथून पसार झाले.

हेही वाचा... निर्भया प्रकरण : आरोपींची फाशी चौथ्यांदा पुढे ढकलली, दिल्लीतील न्यायालयाचा निर्णय..

दरम्यान, आरोपींनी दिलेले सोन्याचे बिस्कीट हे बनावट असल्याचे वारूळे यांना समजले. त्यांनी लगेचच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी उदयभान पांडे व संबंधित महिला (नेहा इंद्रिस) या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला. त्यांनतर पोलिसांनी या दोघांचाही मोठ्या शिताफीने शोध घेऊन त्यांना अटक केली. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.