ETV Bharat / state

जेव्हा सावलीही सोडते आपली साथ, उद्या ठाण्यात 'शून्य सावली' दिवस

उद्या (शुक्रवारी) १७ मे रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी शुन्य सवालीचा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

author img

By

Published : May 16, 2019, 3:36 PM IST

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई - आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही, असे म्हटले जाते. मात्र, शुक्रवारी शुन्य सावलीचा दिवस असल्याने ठाणेकरांची सावली अदृश्य होणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. उद्या (शुक्रवारी) १७ मे रोजी १२ वाजून ३५ मिनिटांनी शुन्य सवालीचा ठाणेकरांना अनुभवता येणार आहे.

माहिती देताना दा कृ. सोमण, खगोल अभ्यासक, जेष्ठ पंचांगकर्ते

याविषयी अधिक माहिती देताना सोमण म्हणाले, उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर येतो. त्यामुळे आपल्याला आपली सावली दिसत नाही. हा अनुभव वर्षातून केवळ २ वेळा घेता येतो. आपण असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो, असाच अनुभव ठाणेकरांना उद्या अनुभवता येणार आहे.

Intro:आपली सावली होणार गायब आज मुंबई उद्या ठाण्यात पाहायला मिळणार झिरो शेडोBody: आपली सावली कधीही आपली साथ सोडत नाही असं म्हटलं जात असलं तरी ते तितकेसे बरोबर नाही. मुंबईकरांना गुरुवार दि. १६ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी तर ठाणेकरांना १७ मे रोजी १२ वाजुन ३५ मिनिटांनी आपली सावली अदृश्य झाल्याचा अनुभव घेता येईल असे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती देतांना सोमण म्हणाले की उत्तर गोलार्धातील कर्कवृत्त आणि दक्षिण गोलार्धातील मकरवृत्त यामधील प्रदेशातच सूर्य आकाशात बरोबर डोक्यावर आल्याने वर्षातून दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो. आपण असतो त्या स्थळाचे अक्षांश आणि सूर्याची क्रांती ज्या दिवशी सारखी होते त्याच दिवशी दुपारी मध्यान्हाला सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येतो. मुंबईचे अक्षांश उत्तर १९ अंश आहेत. गुरुवार दि. १६ मे रोजी सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार असल्याने दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य आकाशात ठीक डोक्यावर येईल आणि मुंबईकरांना शून्य सावलीचा अनुभव घेता येईल.
रविवार २८ जुलै रोजी पुन्हा सूर्याची क्रांती उत्तर १९ अंश होणार आहे. परंतु ते दिवस पावसाळ्याचे असल्याने शून्य सावलीचा अनुभव आपणास घेता येणार नाही. ठाणे, बोरिवली, डोंबिवली, कल्याणकरांना शुक्रवार १७ मे रोजी दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी शून्य सावली अनुभवता येईल असेही खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले.
Byte - दा कृ. सोमण ( खगोल अभ्यासक, जेष्ठ पंचांगकर्ते )Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.