ठाणे : आज पहाटे 1 च्या सुमारास एका मॉलजवळ सापळा रचून तिघांना पकडले, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक विकास घोडके यांनी दिली. पोलिसांनी आरोपींकडून 24 लाख रुपये किमतीचे 60 ग्रॅम कोकेन आणि 3.5 लाख रुपये किमतीची 70 ग्रॅम मेफेड्रोन पावडर जप्त (Cocaine and Mephedrone Drug Seized) केल्याचे त्यांनी सांगितले. तर तीन आरोपींना अटक (Nigerians arrested with drugs) करण्यात आली आहे. (Thane Crime)
मुख्य आरोपीचा शोध सुरू : पोलीस या गुन्ह्यात सामील असलेल्या आणखी एका आरोपीच्या शोधात आहेत. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे, असे घोडके म्हणाले. (Nigerians Arrested In Thane)
नोव्हेंबर महिन्यातही नायजेरियनला अटक : नोव्हेंबर महिन्यात बॉलिवूडसह मुंबईमध्ये गाजलेल्या 'ड्रग्ज कनेक्शन'नंतर नालासोपाऱ्यात कोट्यवधींचे कोकेन जप्त करण्यात आले होते. पोलिसांनी चार नायजेरियन नागरिकांना प्रगती नगर परिसरातून अटक केली होती. प्रगती नगर हा नायजेरियन नागरिकांचा हॉटस्पॉट असून त्यांचे अवैध धंदे पुन्हा सक्रिय झाले आहेत.
दोन पथकांनी केली कारवाई : प्रगती नगर परिसरात नायजेरियन व्यक्ती कोकेन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस पाटील यांना मिळाली होती. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत अवघडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सोलनकर, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, सहाय्यक फौजदार बाळू बांदल, शिवानंद सुतनासे, पोलीस हवालदार अनिल शिंदे, आनंद मोरे, शेखर पवार, सुखराम गडाख यांच्या दोन पथके तयार करून प्रगती नगर परिसरात सकाळपासून सापळा रचला होता.