ETV Bharat / state

ATM Cloning Fraud Case : तब्बल 400 एटीएम क्लोन करत कोट्यवधींचा गंडा, त्रिकुटांना अटक - 400 एटीएम क्लोन करत कोट्यवधींचा गंडा

एटीएम क्लोनिंग करत फसवणूक ( ATM Cloning Fraud Case ) केल्या प्रकरणी डायगर पोलिसांनी तिघांना अटक केली ( Three Arrested by Daighar Police ) आहे. अटक आरोपींना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्रिकुटांनी आतापर्यंत तब्बल 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

अटक आरोपी व जप्त मुद्देमालासह पोलीस
अटक आरोपी व जप्त मुद्देमालासह पोलीस
author img

By

Published : Dec 25, 2021, 8:29 PM IST

ठाणे - एटीएम क्लोनिंग करत फसवणूक ( ATM Cloning Fraud Case ) केल्या प्रकरणी डायगर पोलिसांनी तिघांना अटक केली ( Three Arrested by Daighar Police ) आहे. अटक आरोपींना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्रिकुटांनी आतापर्यंत तब्बल 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वंदना विजय गोरी (वय 65 वर्षे) हे त्यांचा नातू नीरजसोबत 10 जुलै, 2019 रोजी दहिसर येथील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम ( Bank Of Baroda ATM ) मधून दहा हजार रुपये काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी एटीएममध्ये तीन अज्ञात व्यक्तींनी शिरले. त्यांनी दोघांना बोलण्यात गुंतवून हातचलाखीने एटीएम काढून घेत खिशात ठेवलेल्या स्किमरद्वारे एटीएमचा टेडा चोरला. 13 जुलै, 2021 ते 24 सप्टेंबर 2021 दरम्यान तब्बल 73 हजार 200 रुपये बनावट एटीएमद्वारे काढून गोरी यांची फसवणूक केली. याप्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तिघे आरोपी मुळचे उत्तर प्रदेशचे

त्यानंतर डायघर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारावर तीन आरोपीना बेड्या ठोकल्या. जमिल अहमद मोहम्मद दरगाही शेख (वय 22 वर्षे, रा. काका ढाबा, पिसवली मानपाडा, कल्याण पूर्व हा मुळचा गाव चौहानकापूरा, पोस्ट- माऊआईमा, इलाहाबाद उत्तर प्रदेश), गोविंद हनुमंत सिंग (वय 25 वर्षे, रा. महाविर बिल्डींग, रूम नंबर 302 नवली रोड, जिल्हा-पालघर, हा मुळचा चौहानकापूरा, पोस्ट- मऊआईमा, इलाहाबाद, उत्तर प्रदेश), आशिष कुमार उदयराज सिंग (वय 22 वर्षे, रा. रूम नंबर 6, कैलाश नगर, दुर्गा कॉलनी, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व हा मुळचा पोस्ट-माऊआईमा, जिल्हा इलाहाबाद, उत्तर प्रदेश) या तिन्ही आरोपींना 20 डिसेंबर, 2021 रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

असा घालायचे गंडा

खिशामध्ये स्किमर घेवून एटीएम सेंटरमध्ये रक्कम काढण्यास आलेल्या नागरिकाचे एटीएम कार्ड पिन नंबर चोरून बघून त्याला बोलण्यात गुंतवायचे. हातचलाखीने एटीएम खिशात ठेवलेल्या स्किमरद्वारे डेबिट कार्डचा डेटा चोरी करायचे, तो डेटा दुसऱ्या कार्डवर पेस्ट करून एटीएममधून पैसे काढण्याचा गोरख धंदा करत होते. दरम्यान, या तिन्ही आरोपींनी आतापर्यंत सुमारे 400 डेबिट कार्डचा डेटा चोरून या त्याद्वारे बनावट एटीएम कार्ड बनवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. पोलीस पथक अधिक तपास करीत आहे.

हे ही वाचा - Meera Bhynder Crime : आमदार गीता जैन यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्या तीन जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.