ठाणे - राज्यामध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. मात्र, मुंब्रा परिसरात त्याचा काहीही परिणाम दिसून येत नाही. उद्या असणाऱ्या ईदच्या पार्श्वभूमीवर आज मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी करताना दिसून आले. गेल्या तीन-चार दिवसांपासून मुंब्रा परिसरात सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळेला गर्दी पाहायला मिळत आहे. या गर्दीमध्ये कोणीही मास्क लावण्याचा नियम देखील पाळत नाही.
पालिका प्रशासन झोपेत
आज सरकारी सुट्टी असल्यामुळे पालिकेचे प्रशासनही गायब झाल्याचे चित्र आहे. कुठेतरी पोलीस दिसत आहेत. नागरिकांमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवले जात नाही. तसेच या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस, पालिका प्रशासनाचे कर्मचारी, हे कुणीही दिसून येत नाहीत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. ईद निमित्त मुंब्रा भागात मार्केट खुले असून, खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर आहेत.
हेही वाचा - 'तिजोरीत खडखडाट.. तरीही उपमुख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी 6 कोटींचा खर्च कशाला?'
हेही वाचा - चालत्या फिरत्या शाळेतून ज्ञानार्जन करणारे शिक्षक चंद्रहास श्रीवास्तव