ETV Bharat / state

ठाण्यात चोराचा थरार मोबाईलमध्ये कैद; स्वतःला कोयत्याने केले जखमी - Thief Injured Himself

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात चोरी करुन पळणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडताच चोराने त्याच्याकडील कोयत्याने स्वतःला मारुन जखमी केले. ही घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मॅकडोनल्ड येथे घडली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठाण्यात चोराचा थरार मोबाईलमध्ये कैद
author img

By

Published : Aug 22, 2019, 1:48 PM IST

Updated : Aug 22, 2019, 3:06 PM IST

ठाणे - चोरी करुन पळणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडताच चोराने त्याच्याकडील कोयत्याने स्वतःला मारुन जखमी केले. ही घटना ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील मॅकडोनल्ड येथे घडली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठाण्यात चोराचा थरार मोबाईलमध्ये कैद

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात एक चोर चोरी करून पळत होता. त्यावेळी नागरिकांनी त्याला पकडताच त्याने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने स्वतःवर वार करून घेतले. जवळपास १० ते १५ मिनिटे हा थरार नाट्य रस्त्यावर सुरू होते. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नागरिकांनी चोराकडील कोयता हिसकावून घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. चोराला पकडतांना त्याने नागरिकांवर हल्ला देखील केला. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची मोठी धावपळ झाली.

या झटपटीत स्वतःवर चढवलेल्या हल्ल्यात चोर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे. त्यामुळे हा प्रकार किती धक्कादायक होता याचा प्रत्यय पाहायला मिळत आहे.

Intro:ठाण्यात चोराचा थरार मोबाईल मध्ये कैद स्वतःला केले कोयत्याने जखमीBody:ठाण्यात स्थानक परिसरात चोरी करुन पळणाऱ्या चोराला नागरिकांनी पकडताच चोराने त्याच्याकडील कोयत्याने स्वतःला मारुन केले जखमी केले आहे,ठाणे रेल्वे स्थानक येथील मॅक डॉनल्ड येथील घटना असुन या दहा ते पंधरा मिनिटं हे थरार नाट्य रस्त्यावर सुरू होते, यावेळी नागरिकांनी चोरकडील कोयता हिसकावून दिले ठाणे पोलिसांच्या ताब्यात दिले, चोराला पकडतांना त्याने नागरिकांवर हल्ला देखील केला ,या घटनेमुळे स्टेशन परिसरात नागरिकांची मोठी धावपळ झाली, या झटापटीत स्वतःवर चढवलेल्या हल्ल्यात चोर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ,ही संपुर्ण घटना मोबाईल कॅमेरात कैद झाली आहे आणि त्यामुळे हा प्रकार किती धक्कादायक होता याचा प्रत्यय पाहायला मिळतोConclusion:
Last Updated : Aug 22, 2019, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.