ETV Bharat / state

Drain Cleaning: नाले सफाईमध्ये ८ कोटींचा महाघोटाळा? घोटाळ्याची चौकशी करण्याची मनसेची मागणी - निलंबनाची कारवाई

एकीकडे ठाणे पालिका अनेक विकासकामांना निधी अभावी कात्री लावत असतानाच मात्र ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाले सफाईमध्ये मोठी हातसफाई केल्याचे उघड झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगनमताने नाले सफाईमध्ये ८ कोटींचा महाघोटाळा केल्याचे मनसेने माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणले आहे.

Thane Drain Cleaning
नाले सफाईमध्ये ८ कोटींचा महाघोटाळा
author img

By

Published : May 2, 2023, 7:57 PM IST

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाई ही दरवर्षी चर्चेचा विषय आहे. गेले कित्येक वर्ष नालेसफाईच्या नावावर पालिकेचे अधिकारी फक्त हात सफाई करत असल्याचा थेट आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.

ठेकेदारांनी नालेसफाईची कामे केलीच कशी? ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामाकरिता २०२२ - २०२३ या वर्षासाठी सुमारे ८ कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली होती. या कामाच्या अनुषंगाने निविदा काढण्यात आल्या होत्या, पण आजपर्यंत यासाठी कार्यादेश पारित करण्यात आलेला नाही. या कामासाठी कार्यादेश नसतानाही ठेकेदारांनी नालेसफाईची कामे केलीच कशी असा प्रश्न उद्भवत आहे. ह्या नालेसफाईचे काम हे विशेष स्वरूपाचे नसून देखील सदर काम विशेष स्वरूपाचे असल्याचे दाखवत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पालिकेचीच फसवणुक करत संबंधित कामात १९ टक्क्यांचा ट्रेंड रेट असूनही हे काम ट्रेंड किंमतीनुसार करण्यात आलेले नाही.

विभागाकडे माहिती नाही: शिवाय नालेसफाईच्या कामात निविदेमधील अटीनुसार नाल्यातून काढलेल्या गाळाचे मोजमाप, गाळांचे फोटो, नालेसफाईच्या काम सुरू करण्यापूर्वीचे व काम सुरू असतानाचे फोटो, व्हिडिओ रेकॉर्डींग, गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची माहिती, नालेसफाई करणाऱ्या कामगारांची यादी, कामगारांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडे उपलब्ध नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे. यावरूनच या नालेसफाईच्या दिखाव्यामध्ये कोट्यवधींचा अपहार केला जात असल्याचे दिसून येते.

कागदपत्रांच्या माध्यमातून माहिती उघड: दरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून या विषयाचा पाठपुरावा करत असताना संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळोवेळी देण्यास टाळाटाळ केली. घनकचरा विभागाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त आणि मुख्य आरोग्य अधिकारीच या महाघोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे कागदपत्रांच्या माध्यमातून उघड होत आहे. विशेष म्हणजे हा नालेसफाई घोटाळा अधिकृत करण्यासाठी या विभागाच्या उच्चपदस्थ अधिकारी यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या नालेसफाईचे कागदपत्र आधीच्या तारीख पद्धतीने बनविण्याचे काम करत असून त्या आधारे या कामासाठी निधी हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

घोटाळ्यांचे सत्र सुरूच: नव्या आयुक्तांनी पदभार स्विकारल्यानंतर या घनकचरा विभागातील घोटाळ्याची माहिती मिळताच काही महिन्यांपूर्वीच या विभागाच्या उपायुक्तांची बदली करण्यात आली होती. मात्र अजूनही घोटाळ्यांचे सत्र सुरूच आहे. तर शासनाच्या महा टेंडर या वेबसाईटवर एक वर्ष उलटून गेला तरीदेखील अजून पर्यंत या कामाचा कार्यादेश उपलब्धच नसल्याचे ह्या वेबसाईटवर बघितल्यास दिसून येत आहे, अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेच अधिकारी शासनाची ही फसवणुक करत असल्याचे समोर येत आहे.

पालिका अधिकाऱ्यांचे संगनमत: घनकचरा विभागाचे अधिकारी ठेकेदारांबरोबर संगनमत करून नालेसफाईच्या कामात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्त यांनी आयआयटी सारख्या संस्थेच्या माध्यमातून नालेसफाईच्या कामाचे परीक्षण केले पाहिजे. तसेच नालेसफाईच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक तसेच निलंबनाची कारवाई करण्याची तरतूद केली पाहिजे. अशी मागणी मनसे पदाधिकारी स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.

हेही वाचा: Mumbai News सरप्राईझ भेट देऊन नालेसफाईची पाहणी करा मुंबईची तुंबई होणार नाही याची काळजी घ्या राजकीय पक्षांची मागणी

नाले सफाईमध्ये घोटाळ्याची माहिती देताना मनसेने पदाधिकारी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.