ETV Bharat / state

'इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट'द्वारे शासकीय रुग्णालयात महिलेने दिला तिळ्या मुलांना जन्म

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका महिलेवर यशस्वी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट केल्यानंतर त्या महिलेने ३ मुलांना जन्म दिला आहे.

c
c
author img

By

Published : Aug 19, 2021, 5:10 PM IST

ठाणे - उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात एका महिलेवर यशस्वी इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट केल्यानंतर त्या महिलेने ३ मुलांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे या महिलेने अनेक खासगी रुग्णालयात उपचार करून बघितले, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर मध्यवर्ती रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती रोकडे यांच्या मार्गदर्शनाद्वारे ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गर्भाशयाच्या गंभीर समस्येमुळे होत नव्हते मूलबाळ

उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरात राहणाऱ्या निशिता खुशलानी (वय २६ वर्षे) यांचे दोन वर्षांपूर्वी हितेश खुशलानीसोबत विवाह झाला होता. त्यांनतर निशिताला गर्भाशयाची गंभीर समस्या असल्यामुळे मूलबाळ होत नव्हते. यासाठी खुशलानी दाम्पत्याने अनेक खासगी रुग्णालयात महागडे उपचार करून बघितले. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झाला नाही. शेवटी खुशलानी दाम्पत्याने अखेरचा उपाय म्हणून मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. मध्यवर्ती रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. तृप्ती रोकडे यांनी निशिताची वैद्यकीय तपासणी केली आणि तिच्यावर आतापर्यंत झालेल्या उपचारांची माहिती घेतली. निशिता डॉ. तृप्ती यांच्याकडे उपचार घेत आहे. नियमितपणे वैद्यकीय तपासणी व औषधोपचार सुरू झाल्यानंतर निशितावर इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट सुरू झाली या उपचारानंतर आज निशिताने तीन मुलांना जन्म दिला.

गर्भाशयात फायब्रॉईडची गाठ

निशिता ही डिसेंबर, २०२० पासून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत होती. तिच्या विविध वैद्यकीय तपासण्या घेतल्या असता तिच्या गर्भाशयात फायब्रॉईडची गाठ असल्याचे आढळून आले. या गाठी हॉर्मोन्सच्या बदलामुळे होतात. ही गाठ आम्ही शस्त्रक्रिया करुन यशस्वीरित्या काढून टाकली. त्यानंतर तिला गर्भ धारणा झाली आणि तिने तिळ्यांना जन्म दिला. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे, डॉ. जाफर तडवी, डॉ. सिंग, डॉ. मोनाळकर आणि सर्व पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी माहिती डॉ. तृप्ती रोकडे यांनी दिली आहे.

या पुढेही अशा शस्त्रक्रीया यशस्वीरीत्या करू

सरकारी रुग्णालयांमध्येही अशा प्रकारची इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट होऊ शकते, असा विश्वास डॉ. तृप्ती रोकडे आणि आमच्या रुग्णालयाच्या पथकाने निर्माण केला आहे. या पुढेही अशा शस्त्रक्रिया आम्ही यशस्वीरीत्या करू व रुग्णांना शक्य तेवढी मदत करू, असे मध्यवर्ती रुग्णालयचे अधीक्षक डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

एका नवजात बालकाचा मृत्यू

या नवजात तीन मुलांपैकी दोन मुले सुखरूप आहेत. मात्र, यातील एक नवजात बालकाचे वजन फारच कमी होते. डॉक्टरांनी या बालकाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला.

हेही वाचा - जन आशीर्वाद यात्रेच्या आयोजकांवर कल्याण डोंबिवलीतील चार पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.