ETV Bharat / state

नवरदेव लग्नाच्या विधीत व्यस्त असतानाच चोरट्यांनी मारला घरातील दागिन्यांवर डल्ला

नवरदेव लग्नातील विधी करत असतानाच त्याच्या बंद घरातील दागिने व काही महागड्या वस्तूवर चोरट्यांनी डल्ला मारण्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील रघुनाथ नगर येथे राहणाऱ्या नवरदेवाच्या घरी घडली आहे.

crime
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 1, 2021, 9:02 PM IST

ठाणे - नवरदेव लग्नातील विधी करत असतानाच त्याच्या बंद घरातील दागिने व काही महागड्या वस्तूवर चोरट्यांनी डल्ला मारण्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील रघुनाथ नगर येथे राहणाऱ्या नवरदेवाच्या घरी घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल तपास सुरू केला आहे. विकास दुबे, त्या नवरदेवाचे नाव आहे.

कुटुंबासह घरबंद करून लग्नाचा विधी हॉटेलमध्ये

उल्हासनगर कॅम्प नंबर 4 मधील रघुनाथ नगरमध्ये विकास दुबे कुटुंबासह राहतात. विकास यांचे तीन दिवसांपूर्वी रात्री आठ वाजता उल्हासनगरमधील प्रवीण इंटरनॅशनल हॉटेल येथे लग्नाचा विधी पार पडणार होता. यासाठी संपूर्ण दुबे कुटुंब घर बंद करून लग्नासाठी गेले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी घरातील दागिन्यावर डल्ला मारला. त्यानंतर लग्नाचा संपूर्ण विधी उरकून पहाटे तीन वाजता नवरीला घेऊन विकास दुबे घरी आले. तेव्हा घराचे दार आतून बंद असल्याचे त्यांना आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला, त्यांनी अधिक चौकशी केली असता घराच्या खिडकीतून चोरट्यांनी प्रवेश केल्याचे उघड झाले. या चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडून अडीच लाख रुपयांची रोकड काही सोन्याचे दागिने व लॅपटॉप असा 3 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या चोरीच्या घटनांमुळे नवरदेव राहत असलेल्या परिसरात खळबळ उडाली होती. नवरदेव दुबे यांनी चोरी प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - पालकमंत्र्यांकडून मीरा-भाईंदरमधील कोरोना परिस्थितीचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.