ETV Bharat / state

Extortion in Dombivli: डोंबिवलीत व्यापाऱ्याचे अपहरण; अपहरणकर्त्यांना फिल्मी स्टाईलने ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Aug 5, 2022, 7:27 PM IST

खंडणीसाठी डोंबिवलीतील एका व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे. ( Extortion in Dombivli ) हिंमत नाहार असे व्यापाऱ्याचे नाव असून पोलीसांनी त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे. संजय रामकिशन वर्मा (वय 39), संदीप ज्ञानदेव रोकडे (वय 39), धर्मदाज अंबादास कांबळे (वय 36), रोशन गणपत सावंत (वय 40) असे बेड्या ठोकलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

मानपाडा पोलीस स्टेशन
मानपाडा पोलीस स्टेशन

ठाणे - खंडणीसाठी डोंबिवलीतील एका व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या चार आरोपींना मानपाडा पोलिसांनी फिल्मी स्टाईलमध्ये अटक केली आहे. हिंमत नाहार असे व्यापाऱ्याचे नाव असून पोलीसांनी त्याची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केली आहे. ( Manpada Police Action Against Kidnappers ) संजय रामकिशन वर्मा (वय 39), संदीप ज्ञानदेव रोकडे (वय 39), धर्मदाज अंबादास कांबळे (वय 36), रोशन गणपत सावंत (वय 40) असे बेड्या ठोकलेल्या अपहरणकर्त्यांची नावे आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी

एटीएममधून रक्कम काढून देण्याच्या बहाण्याने अपहरण - डोंबिवली पूर्व भागातील मानपाडा रोडला हिमंत नाहार यांचे डिलिक्स प्लायवूड हे दुकान आहे. (3 ऑगस्ट)रोजी आरोपी संजय विश्वकर्मा नावाचा एक इसम आला. ( Kidnapped a Businessman In Dombivli ) त्याने प्लायवूड संदर्भात काही व्यवहार केले. अॅडव्हान्सचे पैसे एटीएममधून काढून देतो असे सांगून दुकानापासून काही अंतरावर घेऊन गेला. तिथून हिंमत नाहार यांना एका कर मधून घेऊन जात. त्यांचे अपहरण केले. काही तासातच हिंमत यांचे पुतणे जितू यांना फोन आला. फोन करणाऱ्याने हिंमत यांना सोडण्यासाठी 50 लाख रुपयांची मागणी केली. जितू यांनी या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अपहरणकर्ते सीसीटीव्हीत कैद - कल्याण परिमंडळ ( 3 )चे पोलीस उपायुक्त सचीन गुंजाळ आणि डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक शेखर बागडे यांनी तपासासाठी सुनिल तारमळे आणि अविनाश वनवे यांच्यासह राजेंद्र खिलारे, सोमनाथ ठीकेकर, विजय कोळी, निसार पिंजारी, प्रवीण किनरे, दीपक गडगे, यल्लाप्पा पाटील, देवा पवार, प्रशांत वानखेडे, सुशांत तांबे, अशोक कोकोडे, ताराचंद सोनवणे, महेंद्र मंझा आणि संतोष वायकर या पोलिसांनी तपास सुरु केला. अपहरण करणारा व्यक्ती जितू यांना पैसे घेऊन काही ठिकाणी बोलवत होता. दुसरीकडे पोलिसांच्या हाती अपहरण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. याच फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

पोलीस पथकाने फिल्मी स्टाईल रचला सापळा - जितू यांना मुंबई आग्रा रोडवरील गोठेघर गावाजवळील एका बोगद्याच्या ठिकाणी पैसे घेऊन येण्यास सांगितले. जितू हे पैसे घेऊन गेले. पोलिसांची चार पथके साध्या वेशात गोठेघर परिसरात आधीच दबा धरुन बसली होती. थोड्याच वेळात त्याठिकाणी एक झायलो कार आले. त्यात तीन व्यक्ती होते. जितू याने आधी काकांना माझ्या ताब्यात द्या, असे सांगितले. त्याचवेळी पोलिसांनी झायलो कारला फिल्मी स्टाईलने घेरले. त्यानंतर गावातील एका खोलीत हिंमत नाहार यांना कोडून ठेवले होते. त्यांची त्याठीकाणाहून सुटका केली. या प्रकरणी या चार अपहरणकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मानपाडा पोलिसांच्या या कामागिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : 'बाळासाहेबांनी शिकवलं रडायचं नाही, सत्यासाठी...'; संजय राऊतांचे विरोधकांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.