ETV Bharat / state

कल्याण-डोंबिवलीच्या महिला उपमहापौरांना मुख्यालयात शिरुन अश्लील शिवीगाळ; एकास अटक - उपेक्षा भोईर

भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कार्यालयात शिरून एका नागरिकाने अशील भाषेत शिवीगाळ केली .याप्रकरणी बाजारपेठ पोलीसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

बाजारपेठ पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jun 21, 2019, 10:13 PM IST

ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयातील उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या कार्यालयात शिरून एका नागरिकाने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना धमकावण्याचाही प्रकार समोर आल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर या मांडा प्रभागातील आहे. आरोपी उमेश साळुंके याने सोसायटीच्या रस्त्यावर अनधिकृत खोल्या व कार्यालयाचे बांधकाम केले आहे. याबाबत सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या 'अ' प्रभाग अधिकार्‍याकडे तक्रार दाखल केली होती. मात्र कारवाई करूनही पालिकेच्या अनाधिकृत नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही. यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपेक्षा भोईर यांनी महासभेच्या पटलावर लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याचा राग आल्याने उमेश थेट महापालिका मुख्यालयात पोहोचला आणि उपमहापौरांना लक्षवेधी मांडल्याबद्दल जाब विचारला .

दरम्यान दोघांमध्ये वाद झाला. आरोपी साळुंके याने त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली असल्याची तक्रार उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसांनी साळुंके यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करित त्याला अटक केली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:अनधिकृत बांधकामाची लक्षवेधी महासभेत मांडल्यावरून उपमहापौरांना अश्लील शिवीगाळ करीत धमकी; आरोपी अटक

ठाणे :- कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या मुख्यालयातील उपमहापौर कार्यालयाची शिरून त्यांच्याच परिसरातील एका नागरिकाने उपमहापौर उपेक्षा भोईर यांना अशील भाषेत शिवीगाळ करीत धमकावण्याचा प्रकार समोर आला आहे, या प्रकारामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे,

या घटनेनंतर उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली , त्यांच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, उमेश साळुंखे असे आरोपीचे नाव असून उद्या त्याला न्यायालयात हजर करणार असल्याचे सांगण्यात आले,
भाजपच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यांच्या मांडा प्रभागातील सोसायटीच्या रस्त्यावर आरोपी उमेश साळुंके याने अनधिकृत खोल्या व कार्यालयाचे बांधकाम केले आहे, याबाबत सोसायटी मध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या 'अ' प्रभाग अधिकार्‍याकडे तक्रारही दाखल केली होती, मात्र कारवाई करूनही पालिकेच्या अनाधिकृत नियंत्रण विभागाकडून कारवाई करण्यात आली नाही यामुळे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपेक्षा भोईर यांनी महासभेच्या पटलावर लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याचा राग आल्याने उमेशने थेट महापालिका मुख्यालयात पोहोचला त्यानंतर त्यांनी उपमहापौरांच्या कार्यालयात शिरून त्यांना लक्षवेधी मांडल्याबद्दल जा विचारला .यामुळे दोघा मध्ये वाद होवुन आरोपी साळुंके याने त्यांना अश्लील शिवीगाळ करून धमकी दिली असल्याची तक्रार उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात दिली , त्यांच्या तक्रारीनुसार बाजारपेठ पोलिसांनी साळुंके यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे, अधिक तपास बाजार पोलिस करीत आहे,

Conclusion:भाजपच्या उपमहापौरांना कार्यालयात घुसून अश्लील शिवीगाळ करत धमकी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.