ETV Bharat / state

कसारा घाटातील दरीत ट्रेलर कोसळून चालकाचा मृत्यू - कसारा पोलीस

कसारा घाटातील एका वळणावर 16 चाकी ट्रेलर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रेलरच्या चालकाचा भलेमोठे लोखंडी पाईप अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कसारा महामार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

d
d
author img

By

Published : Sep 24, 2021, 4:17 AM IST

Updated : Sep 24, 2021, 6:36 AM IST

ठाणे - कसारा घाटातील एका वळणावर 16 चाकी ट्रेलर खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रेलरच्या चालकाचा भलेमोठे लोखंडी पाईप अंगावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कसारा महामार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 22 सप्टेंबर) रात्री घडली.

कसारा घाटातील दरीत ट्रेलर कोसळून चालकाचा मृत्यू

अंधारातच दरीत उतरून बचावकार्य

कसारा घाटातून एक अवजड ट्रेलर शेकडो टन लोखडी पाईप घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास जात होता. त्याचवेळी घाटातील एका अपघाती वळणावर अचानक खोल दरीत ट्रेलर कोसळला होता. या अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच घटनस्थळी पोहचले. तसेच कसारा पोलीस ठाण्याचे पथक, महामार्ग पोलीस घोटी केंद्राचे कर्मचारीही बचावकार्यासाठी उतरले. शेकडो टन लोखंडी पाईपच्या खाली वाहन चालक असणार, असा अंदाज व्यक्त करत आपत्ती व्यवस्थापन पथकाने पाईप हटवले. त्यावेळी पाईपच्या ढिगाऱ्याखाली छिन्नविछिन्न झालेला चालकाचा मृतदेह पथकाला आढळला. त्यानंत तात्काळ त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून पाठविण्यात आले. बचावकार्य सुरू असताना पथकातील चौघे जखमी झाले.

मानवी साखळी करत उतरले दरीत

कसारा पोलीस ठाण्याचे सलमान खतीब, पोलीस कर्मचारी उमेश चौधरी, महामार्ग पोलीस घोटी केंद्रचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन पथकातील शाम धुमाळ, दत्ता वाताडे, मनोज मोरे, अक्षय राठोड, देवा, लक्ष्मण वाघ, जस्सी, बाळू यांचा बचावकार्यात सहभाग होता. 40 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने आपत्ती व्यवस्थापन पथकातील सर्वांनी मानवी साखळी तयार करत दरीत उतरले होते, अशी माहिती शाम धुमाळ यांनी दिली आहे.

हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन पीडितेवर 33 नराधमांचा बलात्कार, व्हिडिओ क्लिप दाखवून केले कृत्य

Last Updated : Sep 24, 2021, 6:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.