ETV Bharat / state

Thane Crime : लग्नास नकार दिल्याच्या वादातून विवाहितेवर हल्ला! आरोपी नाशिकमधून घेतला ताब्यात

एकतर्फी प्रेम करणाऱ्या मित्राला लग्नास नकार दिल्याच्या वादातून भर रस्त्यात २५ वर्षीय विवाहितेवर आरोपी मित्राने धारदार चाकूने गळ्यावर वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील एका सोसायटी समोरील रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात आरोपी मित्रावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरु असता त्याला नाशिकमधून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपीला घेऊन जाताना पोलीस
आरोपीला घेऊन जाताना पोलीस
author img

By

Published : Apr 23, 2023, 4:16 PM IST

माहिती देताना पोलीस अधिकारी

ठाणे : जिग्नेश मोरेश्वर जाधव असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. तर संध्या ( नाव बदलेले ) असे गंभीर जखमी झालेल्या पीडित विवाहीतेचे नाव असून तिच्यावर अद्यापही अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी २५ वर्षीय संध्या ही डोंबिवली पूर्व भागात राहते. तर आरोपी मित्र जिग्नेश हा डोंबिवली पूर्वेकडील देसलेपाडा भागात राहतो. दोघेही एकाच भागात राहत असल्याने दोघांमध्ये मैत्री होती. मात्र मैत्रीच्या आडुन आरोपी जिग्नेश हा जखमी काजलवर एकतर्फी प्रेम करीत होता.

गळ्यावर वार केले : यामध्ये १४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही विवाहिता एकटीच घरच्या दिशेने पायी जात होती. त्याच दरम्यान. ती डोंबिवली पूर्वेकडील शांतीनगर भागातील वेद ओमशांती सोसायटी समोरील रस्त्यावर येताच, आरोपी जिग्नेशने तिला रस्त्यात थांबवून तू मला खूप आवडतेस, मी तुझ्याशी लग्न करेन, तू माझ्या बरोबर ये, असे बोलत असतानाच विवाहितेने त्याला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपी जिग्नेश याने त्याच्याकडे असलेल्या धारदार चाकूने तीच्या गळयावर वार करून तो घटनास्थळावरून पळून गेला.

महिलेवर उपचार : घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत गंभीर जखमी अवस्थेत काजलला डोंबिवलीतील रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ठाण्यातील कळवा तेथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे घटनेच्या दिवसापासून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत होते.

आरोपी जिग्नेश याने गुन्ह्याची कबुली दिली : आरोपी जिग्नेश हा नाशिक येथे असल्याची गुप्त माहिती टिळकनगर पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, पोलीस पथकातील श्याम सोनवणे, अजित राजपूत, संदीप सकपाळ, उमेश राठोड, रवींद्र बागल या पथकाने आरोपीला नाशिक येथून अटक केली. आरोपी जिग्नेश याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच, आरोपी जिग्नेशला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रविण बाकले करत आहेत.

हेही वाचा : Shital Mhatre: शिवसेनेकडून शितल म्हात्रे साई़डलाईन, प्रा. ज्योती वाघमारे करणार लीड?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.