ETV Bharat / state

उल्हासनगरात कामबंद आंदोलनाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू

उल्हासनगरात कामबंद आंदोलनाचा इशारा देताच सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून पालिका कामगारांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याने शेकडो कामगारांनी एकच जल्लोष केला.

Ulhasnagar
सुमारे अडीच हजार कामगारांना आर्थिक फायदा
author img

By

Published : Jan 12, 2021, 5:04 PM IST

ठाणे : सातवा वेतन आयोग लागू व्हावा या मागणीसाठी उल्हासनगर महापालिकेतील विविध कामगार संघटनांनी अनलॉक काळापासून आतापर्यत चार ते पाच आंदोलन करुनही त्यांना यश आले नव्हते.मात्र विखुरलेल्या विविध कामगार संघटना एकत्र येत आज महापालीका प्रशासनाला काम बंदचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची पालिका आयुक्तांनी गंभीर दखल सर्वच कामगार संघटनांना महापौरसह इतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठीकीचे आयोजन करून सातवा वेतन आयोगाचा तिढा सोडण्यात यश आले. त्यामुळे पुढील महिन्यापासून पालिका कामगारांना सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याने शेकडो कामगारांनी एकच जल्लोष केला.

सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय

सुमारे अडीच हजार कामगारांना आर्थिक फायदा ...

शासनाचे आदेश असतांना महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करीत नसल्याच्या निषेधार्थ तीन दिवसापूर्वीच कर्मचाऱ्यांनी काळ्या फित्या लावून काम केले होते. तर चार दिवसापूर्वीही महापालिकेच्या शहाड फाटक परिसरात हजेरी शेडवर कर्मचाऱ्यांनी आयुक्तांच्या फोटोला आरती करून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. महापालिकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असून शहर विकासावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. असे असतानाच सर्वच महापालिका कर्मचारी संघटनेने सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करण्यात येत होती. विखुरलेल्या सर्वच कामगार संघटनानी सातवा वेतन आयोग लागू न केल्यास काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांना दिला होता. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली असून महापालिकेतील सुमारे अडीच हजार कामगारांना याचा आर्थिक फायदा होणार असल्याने सर्वच कामगार संघटनांनी पालिका प्रशासनाने आभार म्हणले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.