ठाणे : शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन आतापर्यंत अनेक पूल उभारण्यात आले. यामध्ये एमएसआरटीसी आणि महानगरपालिका यांच्या मदतीने हे पूल उभे राहिले आहे. ठाणे शहरात आता सध्याच्या स्थितीला अस्तित्वात असलेला पश्चिमेचा सेटीस मीनाताई चौकातील पूल, माजीवाडा जंक्शन पूल, कोपरी नौपाडा पूल, तीन हात नाकापूर खारेगाव पूल, मानपाडा पूल, वाघबीळ पूल मुंब्रा पूल तसेच कळव्याचे दोन पूल असे पूल अस्तित्वात आहेत. आता या सर्व पुलांच्या मालिकेमध्ये नव्याने बनवण्यात येणारे काही पूल समाविष्ट होणार आहेत. यामुळे तलावांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहराला आता पुलांचे शहर अशी नव्याने ओळख मिळणार आहे. (Thane Bridges City)
ठाण्यात काय होणार बदल? : ठाणे महानगरपालिकेची हद्द वाढून उल्हास नदी देखील ठाण्यामध्ये येण्याची चिन्ह आहेत. या नदीवर ती नव्याने पूल उभारण्यात येणार असून आनंदनगर ते गायमुख असा फ्री वे देखील उभारला जाणार आहे. यासोबत सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेल्या तीन हात नाका पुलाला दोन आणखीन कर्वा असलेले पूल नव्याने मिळणार आहेत. गायमुख कावेसर आणखी एक असे नव्याने पुल उभारले जाणार आहे. त्यासोबत वागळे इस्टेट, आयटी हब झाल्याने तेथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी नव्याने पुल उभारला जाणार आहे.
कोपरी सेटिस पुल मान उंचावणार : ठाणे शहराच्या पूर्व भागात असलेला सॅटिस पूल हा ठाणे रेल्वे स्थानकाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून त्यावर जवळपास 200 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ठाणे शहराचा मानदंड ठरणारा स्मार्टसिटी अंतर्गत ठाणे पूर्व स्थानक परिसरातील सॅटीस प्रकल्प डिसेंबर २०२३ पुर्वी पुर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी नुकतेच दिले आहेत. या पुलाचे वैशिष्ट्य पार्किंग व्यवस्था आणि स्टेशन परिसरातील उन्नत वाहतूक व्यवस्था अशी आहे. आत जाताना आणि बाहेर पडताना संपूर्णतः बाहेरून येणार हा पुल शहराची स्थानक भागातील वाहतूक कोंडी कमी करणार आहे.
सर्वात मोठ्या सिग्नलवर अनोखा पर्याय : ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरील सर्वात मोठा सिग्नल हा तीन हात नाकाचा सिग्नल समजला जातो. ज्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना आपली वाहने घेऊन थांबावे लागते आणि यावरच एक पर्याय म्हणून महापालिका आणि राज्य सरकारने एक पर्यायी व्यवस्था उभारली आहे. ही व्यवस्था लवकर अंमलबजावणी होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा वेळ वाचू शकतो ही व्यवस्था तीन हात नाक्यावरील सर्विस रोडवरील वळन असलेले पूल उभारले जाणार आहेत.