ETV Bharat / state

Loco Pilot Suicide : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून लोको पायलटची आत्महत्या

कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून लोको पायलटने आत्महत्या करून आयुष्य संपवले आहे. सुजीत कुमार जयंत असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप सुजीतच्या सहकारी असलेल्या लोको पायलट यांनी केला.

loco pilot Suicide
लोको पायलटची आत्महत्या
author img

By

Published : Aug 20, 2023, 8:18 PM IST

ठाणे : मध्य रेल्वेच्या सेवेतील सहायक लोको पायलटने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा लोको पायलट कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत होता. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुजीत कुमार जयंत (वय ४८) असे आत्महत्या करणाऱ्या लोको पायलटचे नाव आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी : मिळलेल्या माहितीनुसार, मृत सुजीत हे मुळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंब मूळ गावी आहे. त्यातच मृत सुजीत राहत असलेल्या घराचा दरवाजा १४ ऑगस्टपासून उघडला जात नव्हता. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर रविवारी हा आत्महत्येचा प्रकार उघडकीला आला. लोको पायलट सुजीत जयंत यांनी आत्महत्या केल्याचे समजाच मध्य रेल्वे मार्गावरील बहुतांशी लोको पायलट रविवारी दुपारी कल्याण पूर्वेतील लोको पायलट कार्यालय, रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासमोर जमा झाले होते. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून सुजीतने आत्महत्या केल्याचा आरोप सुजीत यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. तसेच दोषी अधिकाऱयावर कारवाई करण्याची मागणीही या सहकाऱ्यांनी केली आहे.

तीन महिन्याचे वेतन रोखले : मृत सुजीत जयंत यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, रेल्वे अंतर्गत विविध प्रकारच्या परीक्षा देऊन आम्ही पदोन्नत्ती प्राप्त करतो. अशाच प्रकारच्या कसोटी परीक्षा सुजीत यांनी देऊन ते खात्यांतर्गत त्यांचे पुढील टप्पे यशस्वीपणे गाठत होते. आकसापोटी सुजीत यांना मागील तीन महिन्यांपासून गैरहजर दाखविण्यात येत होते. चौथा महिना आला तरी त्यांना कामावर हजर करुन घेतले जात नव्हते. त्यांचे तीन महिन्यांचे वेतन रोखण्यात आले होते. त्यामुळे घरभाडे, कुटुंब चालविण्याचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला होता.

सुजीत यांची आर्थिक कोंडी : रेल्वेच्या वरिष्ठांकडून कोणतेही सहकार्य न मिळता अडवणुकीची भूमिका घेण्यात येत असल्याने, सुजीत मानसिकदृष्ट्या त्रस्त होते. सर्व वरिष्ठांना सुजीतला होणाऱ्या त्रासाची माहिती होती. तीन महिने वेतन न मिळाल्याने सुजीत यांची आर्थिक कोंडी झाली होती. आम्ही सहकारी काही रक्कम सुजीत यांना त्यांचा दैनंदिन, मासिक खर्च भागविण्यासाठी देत होतो, अशी माहिती सुजीत यांच्या सहकारी मित्रांनी दिली.

वरिष्ठांविरुद्ध कारवाईची मागणी : मृत सुजीत यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या वरिष्ठांविरुद्ध कारवाई झाली पाहिजे, या मागणीसाठी सर्व लोको पायलटनी रविवारी कल्याण पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे सुरक्षा बळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. लोको पायलटनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आंदोलनाच्या भीतीने लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तर दुसरीकडे कल्याण पूर्व भाग मागील आठवडाभर हत्या, खून, आत्महत्या घटनांनी ढवळून निघाला आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे.

हेही वाचा -

  1. Nanavare Couple Suicide Case : ननावरे दाम्पत्य आत्महत्या प्रकरण; भावाने 'बोट' छाटून गृहमंत्र्यांना इशारा देताच चार आरोपींना अटक
  2. Ahmednagar Crime News: पत्नी- सासूचा खून करून फरार झालेल्या घरजावयाची आत्महत्या, खुनानंतर स्वतःच्या आईकडे सोपवली मुलगी
  3. Pune Crime News : सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नीसह पुतण्याचा केला खून, गोळी झाडून केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.