ETV Bharat / state

Bhatsa Dam Electricity Generation Stop : भातसा धरणातून होणारी वीजनिर्मिती एक वर्षांपासून ठप्प ! राज्य सरकारचे दुर्लक्ष

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरणा लगत असलेला, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचा १५ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक वर्षांपासून बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे.

Bhatsa Dam Electricity Generation Stop
वीजनिर्मिती एक वर्षांपासून ठप्प
author img

By

Published : Feb 8, 2023, 8:08 PM IST

ठाणे : एकीकडे महाराष्ट्रात विजेचे संकट ओढावलेले असतानाच व राज्यात विजेची टंचाई असल्याने काही जिल्ह्यात विजेच्या लोड शेडिंगचा भयानक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील भातसा धरणा लगत असलेला, महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीचा १५ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तांत्रिक बिघाडामुळे तब्बल एक वर्षांपासून बंद असल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष केल्याने हा महत्त्वाचा विज केंद्र दुरुस्ती अभावी अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.

Bhatsa Dam Electricity Generation Stop
Bhatsa Dam Electricity Generation Stop

तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्यात अपयश : महाराष्ट्र वीज निर्मिती कंपनीच्या अभियांत्रिकी विभागाला या तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती करण्यात अद्यापही यश न आल्याने, हा विज प्रकल्प २७ फेब्रुवारी २०२२ पासून बंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई, ठाणे महानगराला दररोज तब्बल २३०० एमएलडी पाणी पुरवणाऱ्या भातसा धरणा लगत राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाने १५ मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारला आहे. हा वीजनिर्मिती प्रकल्प जलसंपदा विभागाने महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीला करारावर चालविण्यास दिलेला आहे. या प्रकल्पात तयार होणारी वीज पडघा येथील ग्रीड कंपनीला वितरीत केली जाते. राज्याला वीज पुरवठा करण्यास मदत करणारा हा वीज निर्मिती केंद्र आता संकटात सापडला आहे.

एक वर्षापासून बंद : गेल्या वर्षी २७ फेब्रुवारीला भातसा धरणा लगत वीज निर्मिती करणाऱ्या या वीज केंद्रातील एक पाण्याचा पाईप अचानक फुटला होता. यामुळे वीज केंद्रात पाणी शिरुन वीजनिर्मिती केंद्र हे पाण्याखाली गेल्याची घटना घडली होती. यांमध्ये वीज निर्मिती करणाऱ्या कोट्यवधी निधी खर्च करून उभारलेल्या मशनरी पाण्यात भिजून गेल्याने त्यांत तांत्रिक बिघाड झाला. यामध्ये जनरेटर, टरबाईन यांच्यात पाणी शिरल्याने या मशनरी पुर्णपणे नादुरुस्त झाल्या, परिणामी या महत्त्वाच्या तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीची वीज निर्मिती पुर्णतः ठप्प झाली. तथापि नादुरुस्त वीज निर्मिती केंद्राची दुरुस्ती वेळेवर होऊ न शकल्याने, तब्बल एक वर्षांपासून भातसा धरणाचा वीज निर्मिती केंद्र बंद अवस्थेत पडून आहे.

राज्य सरकार कडून मदत नाही : नादुरुस्त झालेल्या मशनरींच्या यंत्र सामुग्रीच्या दुरुस्तीसाठी लागणारे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध होत नसल्याने, तसेच दुरुस्तीच्या कामासाठी निधी मिळत नसल्याने वीजनिर्मिती दुरुस्तीचे काम रखडल्याचे सांगण्यात येत आहे. राज्य सरकार कडून दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने या विज निर्मिती केंद्राची अत्यावश्यक रखडलेली आहे. दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनीच्या वैतरणा येथील कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सुलाने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा : Shirdi Fraud : शिर्डी विमानतळावर नोकरी लावून देतो म्हणत चक्क 55 लाखांची फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.