ETV Bharat / state

ठाण्यात अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक - thane police

अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीघांना नवी मुंबई कळवा रस्त्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक
author img

By

Published : Jun 11, 2019, 11:52 PM IST

ठाणे - अंमली पदार्थ विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या तीघांना नवी मुंबई कळवा रस्त्यावर सापळा रचून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी ८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक केलेल्या त्रिकुटाला १४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक

तीन तस्कर ४ किलोग्रॅम चरस ठाण्यात विक्रीसाठी आणनार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाला मिळाली होती. पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना ८ जून रोजी याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने व ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने ऐरोली कळवा रोडवरील एसटी वर्कशॉप येथे सापळा लावला.

यावेळी समीर आलम महंमद स्माईल शेख (वय-२२, रा. जुहूगाव, वाशी, नवी मुंबई) आणि व्यंकट श्रीमंत काळे (२२, महापे गाव, नवी मुंबई) अशा दोघा संशयीत दुचाकीस्वार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील ज्युपिटर या दुचाकीत प्रत्येकी दोन असे एकूण चार किलो चरस आढळून आले.

अटकेतल्या दोघा तरुणांच्या चौकशीतून हे अमली पदार्थ नवी मुंबई येथील खैरणेगाव येथे राहणाऱ्या अस्लम रियाजुद्दीन अन्सारी (३४) याने पुरवल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यास देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रथम अटक केलेल्या दोघा आरोपींकडून ८ लाख ५३ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चरस, दुचाकी आणि मोबाईलचा समावेश आहे.

Intro:
गुन्हे शाखेची कारवाई-चरस तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला अटक
८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगतBody:

चरस हा अमली पदार्थ विक्रीसाठी काही तस्कर घेऊन येणार असल्याच्या खबऱ्याच्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकाने नवीमुंबई कळवा रस्त्यावर सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून पोलीस पथकाने ८ लाख ५३ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल यात चरस दुचाकी मोबाईलचा समावेश आहे. अटक त्रिकुटाला न्यायालयात नेले असता त्याना १४ जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

ठाण्यात विक्रीसाठी 4 किलो ग्रॅम चरस आणण्यात येणार असून तीन तस्कर असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ च्या पोलीस पथकातील पोलीस हवालदार रवींद्र काटकर यांना 8 जून रोजी मिळाली होती. ही माहिती मिळताच युनिट एकच्या पथकाने व ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाने पंचासह ऐरोली कळवा रोडवरील एसटी वर्कशॉप येथे सापळा लावला. यावेळी समीर आलम महंमद स्माईल शेख (वय-22, राहणार- जुहू गाव, वाशी, नवी मुंबई) आणि व्यंकट श्रीमंत काळे (22, महापे गाव, नवी मुंबई) अशा दोघा संशयीत दुचाकीस्वार तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्या जवळील ज्युपिटर या दुचाकीत प्रत्येकी दोन असा एकूण चार किलो चरस आढळून आला. अटकेतल्या दोघा तरुणांच्या चौकशीतून हे अमली पदार्थ नवी मुंबई येथील खैरणेगाव येथे राहणाऱ्या अस्लम रियाजुद्दीन अन्सारी (34) याने सप्लाय केल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यास देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रथम अटक दोघा आरोपींकडून 8 लाख 53 हजार 150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
Byte दीपक देवराज(पोलीस उपायुक्त गुन्हे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.