ठाणे : भिवंडीत शहरांमध्ये यंत्रमाग कारखानामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी चहा नाष्टाची बरेच लहान लहान हॉटेल आहेत. तर बहुतांश हॉटेल व्यवसायिक हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असताना मागील एका महिन्यापासून भिवंडी शहरांमध्ये पहाटे हॉटेल मालकांना चाकूची धाक दाखवून, जखमी करून त्यांच्याकडून गल्ल्यातील पैसे जबरदस्ती खेचून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत होत्या. या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतीनगर पोलीस ठाणेचे एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आले होते.
सापळा रचून अटक: याप्रमाणे गुन्हे करणारे रेकॉर्डवरील आरोपी नौशाद उर्फ अतिक हलीम अन्सारी व अभय नाथ हरिवंश दुबे हे दोघेही हॉटेलमध्ये जबरी चोरी करण्याचे गुन्हे करीत असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरोपी अभयनाथ हरिवंश दुबे हा भिवंडी परिसरात येण्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली.
आठ गुन्हे केल्याची कबुली: तसेच त्याची अंगझडीत घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस मिळून आले. दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे अधिक कसून चौकशी केली असता त्याने नौशाद खालील अंसारी, इमरान अख्तर सय्यद, रोशन बरकत सय्यद, या तिघांच्या साथीने एकूण आठ गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. शिवाय या गुन्हेगाराने आणखी काही गुन्हे केलेत आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत.
धाक दाखवून सोनसाखळी चोरली: या आधीही ठाणे येथे अशीच एक घटना घडली होती. एका वृद्ध महिलेला धारदार चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोनसाखळी घेऊन पळालेल्या दोन अट्टल गुन्हेगारांना कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. प्रदीप उर्फ सोनु लालचंद विश्वकर्मा (वय 25 रा. बनेली टिटवाळा) आणि वसीम अब्दुल अन्सारी (वय 22 रा. आंबिवली, कल्याण) असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे होती. तर चौकशी दरम्यान या दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे.