ETV Bharat / state

ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पाच बारवर महापालिकेची कारवाई - ठाण्यात पाच बारवर महापालिकेची कारवाई

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन कोरोना संदर्भात प्रशासनातर्फे निर्देश देण्यात आले होते. या नियमांचे उलंघन करणाऱ्या पाच बारवर ठाणे महानगरपालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे.

thane municipal corporation tak action against five bar for violating Corona rules
ठाण्यात कोरोना नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पाच बारवर महापालिकेची कारवाई
author img

By

Published : Feb 23, 2021, 1:08 PM IST

ठाणे - कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंटवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत पाचही बार सील केले. ही कारवाई काल उशीरा रात्री करण्यात आली.

दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई -

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापर करावा तसेच सोशल डिस्टन्सिंग पालन करावे, असे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तत्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वीच दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली. या कारवाईदरम्यान नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. यामध्ये नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडी येथील सनसिटी लेडीज बार तसेच हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो या बारवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही, असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी दिला आहे.

हेही वाचा - पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.