ETV Bharat / state

Illegal Hospital Sealed : भिवंडीत अवैधरित्या सुरू असलेल्या 'हयात हॉस्पिटल'ला अखेर सील, परिचारिकेविरुद्ध गुन्हा दाखल - latest news from Thane

भिवंडी शहरात बोगस डॉक्टरांवर ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारून आतापर्यंत ३०हून अधिक बोगस डॉक्टरांना अटक केली. त्यातच भिवंडी निजामपूर महापालिका हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या 'हयात' हॉस्पिटल'ला आज (गुरुवार) दुपारी सील केले आहे. तर अवैधपणे रुग्णालय चालवणाऱ्या परिचारिकेवर फौजदारी कारवाईसाठी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दिला आहे. नजमा सय्यद असे गुन्हा दाखल झालेल्या परिचारिकेचे नाव आहे.

Illegal Hospital Sealed In Bhiwandi
अवैध रुग्णालय
author img

By

Published : Apr 20, 2023, 4:02 PM IST

ठाणे: प्राप्त माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी ठाणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांना भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरात अनधिकृतपणे 'हयात हॉस्पिटल' नावाने रुग्णालय सुरू असल्याची तक्रार मिळाली. काही दक्ष नागरिकांनी महापालिकेच्या खासगी हॉस्पिटल तक्रार निवारण समितीला प्रत्यक्ष भेट देऊन ही तक्रार केली होती. या आधारे समितीने 'हयात हॉस्पिटलला' भेट दिली. दरम्यान हॉस्पिटलने 'महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन' (सुधारित) नियम २०२१ अन्वये रुग्णालयाच्या नोंदणीसाठीची आवश्यक कागदपत्रे महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागात सादर न करता रुग्णालय अवैधरित्या सुरू केल्याचे समितीच्या निदर्शनास आले.

तरीही बेकायदा हॉस्पिटल सुरूच: त्यानंतर १८ एप्रिल रोजी महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी 'हयात हॉस्पिटल' प्रशासनास पुढील आदेश होईपर्यंत कामकाज बंद ठेवण्यासाठी नोटीस बजावली. त्याचप्रमाणे 'मुंबई शुश्रूषा नोंदणी अधिनियम १९४९' चे कलम ६ अन्वये कारवाई करण्याचे निर्देश दिले होते; मात्र तरीही 'हयात हॉस्पिटल्या' नजमा सय्यद या परिचारिकेने कामकाज सुरूच ठेवले. अखेर (आज) गुरुवारी २० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास भिवंडी महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात या हॉस्पिटलला सील केले.

हॉस्पिटल वर्षभरापासून सुरू? मागील १ वर्षापासून परिचारिका नजमा सय्यद 'हयात हॉस्पिटल' अनधिकृतपणे चालवत असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे भिवंडी शहर पोलीस ठाण्यात परिचारिकेविरुद्ध महापालिकेकडून तक्रारी अर्ज दाखल करण्यात आला असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसरीकडे महापालिकेच्या या कारवाईमुळे अवैध रुग्णालय चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तरीही मागील वर्षभरापासून महापालिकेच्या नाकाखाली अवैध रुग्णालय कसे काय सुरू होते, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

बोगस डॉक्टरला अटक: मुंबईत गेल्या ४ वर्षांपासून परवाना नसताना औषधोपचार करणाऱ्या सुकेश गुप्ता या व्यक्तीला 22 मार्च, 2022 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. यात संबंधित व्यक्तीने सांगितले, की तो 12 वीच्या परीक्षेत नापास झाला होता आणि दररोज सुमारे 50 रुग्णांवर तो उपचार करत होता. या कारवाईत त्याच्याकडून औषधे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

हेही वाचा: NCP Meeting Mumbai : मुंबईत राष्ट्रवादीचा मेळावा; निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचे नावच नाही, पुन्हा चर्चा सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.