ETV Bharat / state

ठाणे शहरात 'कोव्हिड 19 योद्ध्यांं'ची फौज तैनात - Corona Warriors

ठाण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेकडून कोव्हिड-19 योद्धा म्हणून काही तरुणांची नेमणूक केली आहे. हे तरुण ठाणे महापालिका हद्दीत टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांचे समुपदेश करणार आहेत. जे सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशांविरोधात पोलिसांतही तक्रार करणार आहेत.

corona warriors
कोव्हिड-19 योद्धे
author img

By

Published : May 8, 2020, 6:37 PM IST

Updated : May 8, 2020, 8:20 PM IST

ठाणे - राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून पालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या संकल्पनेतून ठाणे कोव्हिड 19 योद्ध्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोव्हीड योद्धांना सुचना देताना पालिका अधिकारी
शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरातील अनेक नागरिक नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत, त्यास आळा घालण्यासाठी तसेच संचारबंदीचे योग्य पालन व्हावे आणि कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी प्रभागनिहाय स्थानिक नगरसेवकांच्या सहकार्याने समिती तयार करून स्वयंसेवकांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे तरुण कोव्हिड योद्धा म्हणून काम करणार आहे. सध्या वागळे प्रभाग समिती व लोकमान्य नगर प्रभाग समितीमध्ये हे योद्धा कार्यरत आहेत.ठाणे महापालिकेच्यावतीने 'ठाणे कोव्हिड-19 योद्धा' या नावाने 'घरातच रहा कोरोनाला हरवा', असा संदेश देणारे विशेष जॅकेट परिधान केलेले हे योद्धा शहरातील झोपटपट्टी व दाटलोक वस्ती परिसरात काम करीत आहेत. विविध कारणे सांगून रस्त्यावर फिरणारे नागरिक, मैदानावर खेळण्यासाठी एकत्र येणारे तरुण, चौका चौकात एकत्र येणारे नागरिक या सर्वांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये, संचारबंदीचे पालन करावे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे आदी गोष्टींबाबत हे योद्धा नागरिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

हेही वाचा - मुंबईवरून उल्हासनगरात प्रसूतीसाठी आलेली महिला कोरोनाबाधित

Last Updated : May 8, 2020, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.