ठाणे - महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या व स्टेम प्राधिकरण यांच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी शुक्रवारी ठाणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेतर्फे शुक्रवार दिनांक २० सप्टेंबरला सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत १२ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा - वाहन उद्योगात मंदी नाही; व्यापारी संघटना सीएआयटीचा दावा
देखभाल व दुरूस्तीच्या कारणामुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे उपनगरअभियंता यांनी केले आहे.
हेही वाचा - धारावी मतदारसंघ काँग्रेसच्या वर्षा गायकवाड राखणार का?