ETV Bharat / state

कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे - आनंद परांजपे

author img

By

Published : Apr 12, 2019, 2:36 PM IST

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोपरीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली.

आनंद परांजपे नागरिकांच्या भेटी घेताना

ठाणे - शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोपरीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. यावेळी कोपरीतील नागरिकांनी आनंद परांजपे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी मतदारांना केले.

महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी ठाण्यातील कडवा गल्लीतील पुतळ्याला अभिवादन करून महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी कोपरी येथील चेंदनी कोळीवाडा, अष्टविनायक चौक, मंगला हायस्कूल, प्रेम नगर, गावदेवी भाजी मार्केट, सिधी कॅम्प, बारा बांगला, आनंद नगर या ठिकाणी जाऊन प्रचार केला. दरम्यान कोपरी येथे घरोघरी जाऊन नागरिकांचे आशीर्वाद परांजपे यांनी घेतले.

आनंद परांजपे यांची प्रचार यात्रा

कोपरीतील मित्र पक्षाच्या कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेतल्या. आमदार जितेंद्र आव्हाडही प्रचारास उपस्थितीत होते. यावेळी ५ वर्षात रखडलेल्या विकासाबाबत मतदारांना सांगण्यात आले. महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या कोपरी येथील क्लस्टर योजनेबाबत नागरिकांची फसवणूक केली जात आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. सत्ताधारी पक्षाने क्लस्टरचे गाजर दाखवले असून भावनिक मुद्यावर शिवसेना राजकारण करीत असल्याचे नागरिकांना सांगण्यात आले. मतदारांनी डोळे उघडून आनंद परांजपे यांना एक संधी द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Intro:कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे - आनंद परांजपेBody:

शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोपरीत संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी जोरदार प्रचारात सुरुवात केली. यावेळी कोपरीतील स्री, पुरुष, ज्येष्ठ नागरिकांनी आनंद परांजपे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी बोलताना आनंद परांजपे यांनी, कोपरीकरांनी विकासाला मतदान करावे, असे आवाहन केले. महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती दिवशी ठाण्यातील कडवा गल्लीतील पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(गवई), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(एकतावादी) या संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांनी आजच्या प्रचाराला सुरुवात केली. नंतर सिडको येथील एकविरा मातेचे दर्शन परांजपे यांनी घेतले. त्यानंतर त्यांनी कोपरी येथील चेंदनी कोळीवाडा,अष्टविनायक चौक,मंगला हायस्कूल,प्रेम नगर,गावदेवी भाजी मार्केट,सिधी कॅम्प,बारा बांगला,आनंद नगर या ठिकाणी जाऊन प्रचार केला. दरम्यान कोपरी येथे "डोअर टू डोअर" जाऊन नागरिकांचे,मतदारांचे आशीर्वाद परांजपे यांनी घेतले.
ठाणे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला ठाण्यातून जोरदार सुरुवात झाली अशुन आघाडीचे उमेदवार आनंद प्रकाश परांजपे यांनी आघाडी घेतली आहे. यावेळी ढोल,तश्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली,चौकाचौकात आनंद प्रकाश परांजपे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलांनी तर प्रत्येक ठिकाणी पराजपे यांचे औक्षण केले. तसेच जेष्ठ नागरिकांनी स्वागत देखील केले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत असल्याने प्रचारात चारचंद लागले. कोपरीतील काही ठिकाणी मित्र पक्षाच्या कार्यलयात जाऊन गाठीभेटी घेतल्या यावेळी 5 वर्षात रखडलेल्या विकासाबाबत नागरिक,मतदार यांना सांगण्यात आले. महत्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या कोपरी येथील क्लस्टर योजनेबाबत नागरिकांची फसवणूक केली जात आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. सत्ताधारी पक्षाने क्लस्टरचे गाजर दाखवले असुन भावनिक मुद्यावर शिवसेना राजकारण करीत असल्याचे नागरिकांना पटवून सांगण्यात आले. नागरिकांनी, मतदारांनी डोळे उघडून आनंद परांजपे यांना एक संधी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.