ETV Bharat / state

महाराष्ट्राला महापुराचा फटका, ठाण्यातून पूरग्रस्थांसाठी मदतीचा ओघ सुरू - पूर न्यूज

महाराष्ट्रातील अनेक भागाला पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे अशा भागातील दुर्घटनाग्रस्थांसाठी ठाण्यातून जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली जाणार आहे. त्याचे काम जोरात सुरू आहे.

thane
thane
author img

By

Published : Jul 26, 2021, 9:32 AM IST

ठाणे - महाड येथील पुरग्रस्थांना मदत म्हणून ठाण्यातील विविध ठिकाणावरून शिवसेना पक्षाकडून जीवनाश्यक वस्तूंचे अनेक ट्रक भरून ठाण्यातून निघत आहेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ज्या भागात पावसाचा फटका बसला आहे, त्या ठिकाणी देखील मदत केली जाणार असल्याचे ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकनाथ शिंदे- नगरविकास मंत्री

'पूरग्रस्तांना सर्वोपतरी मदत केली जाणार'

'ठाण्यातील विविध भागात अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू व साहित्यांचे किट बनवण्याचे काम जोमाने सुरू आहे. त्याची पाहणी देखील एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचबरोबर ज्या ज्या भागात पूर आला आहे, दरडी कोसळल्या आहेत. जी ठिकाणे धोकादायक झाली आहेत. त्या भागात राज्य सरकारकडून कायम स्वरूपाचे पुनर्वसन केले जाणार आहे. पूरग्रस्तांना सर्वोपतरी मदत केली जाणार आहे', असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

एनडीआरएफ प्रमाणे एसडीआरएफ टीम सक्षम होणार

'दुसरीकडे पावसामुळे बचाव कार्य अवघड होते. मात्र, अशा भागात दुर्घटना घडतात, त्या ठिकाणी बचावकार्यासाठी जिल्हा स्थरावर एनडीआरएफप्रमाणे एसडीआरएफ टीम सक्षम करणे गरजेचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर बचावकार्य टीम कशी सक्षम करता येईल हे देखील महत्वाचे आहे', असे देखील शिंदे यांनी सांगितले आहे. दरम्यान, राज्यात पुरग्रस्थांना ठाण्यातून एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने मदत करण्यासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के व माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांची टीम काम करत आहे. ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि कोपरीतील महापालिकेच्या शाळेतून मदत कार्याचे काम सुरू आहे.

मदतीची जुनी आठवण

शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या काळात मदतीच्या मोहिमेची सुरवात झाली आहे. तीच परंपरा आजही पाहायला मिळत आहे. राज्यातील सर्व संकटांच्या वेळी आणि त्या नंतरही ठाण्यातून मदतीचा ओघ सुरूच आहे. यापुढेही ही मदत पाहायला मिळणार आहे. कोविड काळातही हजारो घरात रेशन पोहोचवण्याचे काम ठाण्यातून झाले आहे.

हेही वाचा - पावसाळ्यात पाणी टंचाई : औरंगाबादेत पाण्याचा ठणठणाट; मुख्यमंत्र्यांनी १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे केले होते उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.