ETV Bharat / state

Thane Gas Cylinder Explosion : ठाण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट; 6 झोपड्या जळून राख

author img

By

Published : Mar 3, 2022, 8:17 PM IST

Updated : Mar 3, 2022, 9:49 PM IST

दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडपट्टीतील 6 झोपड्यांना आग ( Thane Gas Cylinder Explosion ) लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Thane Gas Cylinder Explosion
Thane Gas Cylinder Explosion

मुंबई - ठाण्यात आज ( गुरुवार ) 4.35 च्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली ( Thane Gas Cylinder Explosion ) आहे. दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने झोपडपट्टीतील 6 झोपड्यांना आग लागली. यामध्ये झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी अथवा जखमी झाली नसल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.

  • Maharashtra | An incident of gas cylinder explosion occurred at Gagangiri Chawl, Thane today at around 4.35 pm. Two cylinders exploded leading to damage to 6 slum rooms. No casualty or injury reported: Thane Municipal Corporation pic.twitter.com/TP9ApRaXGU

    — ANI (@ANI) March 3, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सविस्तर माहिती अशी की, ठाण्यातील घोलाई नगर येथील गणेश वेल्फेअर सोसायटी परिसरात 2 सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये 6 झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच कळवा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग, फॉरेस्ट विभाग, अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले. यावेळी अग्निशमन दलाचे १ फायर इंजिन आणि १ रेस्क्यू वाहन घटनास्थळी दाखल झाले. सध्या येथील आग विझवण्यात आली असून, संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, सिलेंडरचा स्फोट होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ठाण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट 6 झोपड्यांना आग

या परिसरात शेकडो अवैध झोपड्या या अवघ्या काही दिवसांत उभ्या राहिल्या आहेत. या झोपड्यांकडे महानगरपालिकेचे लक्ष नसल्यामुळे त्या फोफावल्या आहेत. महानगरपालिकेचे यांच्यावर कारवाई केली असती, तर असे प्रकार झाले नसते, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

हेही वाचा - Eknath Khadse On BJP : भाजपचे दहशतवाद्यांशी संबंध; एकनाथ खडसे यांचा गंभीर आरोप

Last Updated : Mar 3, 2022, 9:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.