ठाणे : ठाणे जिल्ह्यात काल 14 ते 15 वर्षे वयोगटातील चार शाळकरी मुले बेपत्ता झाली होती. त्या मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना ही मुले आज गोव्यात सापडली.
मुले काल झाली होती बेपत्ता : ठाणे जिल्ह्यातल्या अंबरनाथ शहराताल ही मुले काल घरून शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र ती शाळेत पोहचलीच नाहीत. मुलांच्या पालकांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 353 (अपहरण) अंतर्गत गुन्हा दाखल केला. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
मुले शाळेत पोहचलीच नाहीत : पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही मुले अंबरनाथमधील वेगवेगळ्या भागातील रहिवासी होती. ती सर्व एकाच शाळेत शिकत होती. ही मुले काल सकाळी 7 वाजता शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली, मात्र ती शाळेत पोहचलीच नाहीत. मुलांच्या पालकांनी अंबरनाथ आणि इतर शेजारच्या भागात त्यांचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाहीत. एका मुलाच्या शिक्षकाने मुलाच्या पालकांना फोन करून कळवले की त्यांचा मुलगा शाळेत आला नाही. जेव्हा विद्यार्थ्याचे पालक तपासणीसाठी शाळेत गेले तेव्हा त्यांना समजले की इतर तीन मुले देखील शाळेत आली नाहीत. त्यानंतर या चार मुलांच्या पालकांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मुलांचा शोध सुरु केला होता.
हे ही वाचा : Mumbai Crime News : खंडणीसाठी केले हॉटेल मालकाचे अपहरण, पोलिसांनी 12 तासांत ठोकल्या बेड्या!