ठाणे - शहरासह परिसरात सातत्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोच आहे. शनिवारी ठाण्यात विविध प्रभाग समितीच्या हद्दीत तब्बल 60 नवे रुग्ण आढळले आहेत. या नव्या रुग्णांसह ठाण्यातील बाधितांची संख्या 611 वर पोहचली आहे.
सोमवारपासून सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सोमवारी ठाण्यात कोरोनाचे नवे 23 रुग्ण आढळले, मंगळवारी - 40, बुधवारी- 46, गुरुवारी-64, शुक्रवारी-51 तर शनिवारी नव्या 60 रुग्णांची भर पडली असून रुग्णांची एकूण संख्या ही 611 एवढी झाली आहे. ठाण्यात पावसाळ्यापूर्वीच कोरोनाच्या रुग्णांचा गुणाकार होत आहे. तर पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होण्याची शक्यता वाढलेली आहे.
शनिवारपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 671 वर पोहचली. तर शनिवारी बरे होऊन रुग्णालयाच्या बाहेर पडणाऱ्या रुग्णांची संख्या 6 आहे. आतापर्यंत 120 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर प्रत्यक्षात रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असलेल्यांची संख्या 527 एवढी आहे. 1, 645 संशयित रुग्ण हे क्वारंटाईन आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या विविध प्रभाग समितीत सापडलेले नव्या रुग्णांची संख्या 60 आहेत. हे रुग्ण माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीत-1, वर्तकनगर प्रभाग समितीत-4, लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समितीत-11, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीत-4, उथळसर प्रभाग समितीत-4, वागले प्रभाग समितीत-12, कळवा प्रभाग समितीत-5, मुंब्रा प्रभाग समितीत-14, दिवा प्रभाग समितीत-5 असे एकूण 60 जण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.