ETV Bharat / state

व्हायरल व्हिडिओमुळे रिक्षाचालकाचं फळफळलं नशीब; 'तो' दिसला चक्क माजी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत

author img

By

Published : Nov 24, 2019, 8:05 AM IST

Updated : Nov 24, 2019, 1:50 PM IST

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंसारखा हुबेहुब चेहरा असणाऱ्या धनंजय यांना राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दाक्षिणात्य सिनेमात चंद्राबाबूंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. त्यामुळे येथील कलाकारांनाही सिनेमात काम करण्यासाठी झगडावे लागते. मात्र, असे असतना धनंजय यांना त्यांच्या चेहरा आणि कलागुणांमुळे ही भूमिका मिळाली आहे.

धनंजय प्रभुणे

ठाणे - कोणाचं नशीब कधी आणि कसे फळफळेल हे सांगता येत नाही. मात्र, एका रिक्षाचालकाचं नशीब सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे असं काही फळफळलं, की तो रातोरात चंदेरी दुनियेत प्रकाशझोतात आला आहे. त्याने चक्क राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दक्षिणात्य चित्रपटात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंची भूमिका साकारली आहे. धनंजय प्रभुणे असे या रिक्षा चालकाचे नाव असून ते कुटंबासह डोंबिवलीत राहतात.

thane
कम्मा राज्यम लो कडप्पा रेडलु चित्रपटाचे पोस्टर

विशेष म्हणजे, धनंजयने त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आपला छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यावेळी जेवण वाढत असताना एका भाविकाने प्रभुणे चंद्राबाबू नायडू सारखे दिसत असल्याने त्यांचा व्हिडीओ काढून घेतला. हा व्हिडिओ हैदराबादमधील समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्द झाला. त्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ कोणाचा आहे, हे शोधून देईल त्याला १ लाख रुपयांचे बक्षीस देईन असे राम गोपाल वर्मा यांने ट्विटरवर टाकले. हे ट्विट आणि व्हिडिओ हैदराबाद येथील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने पाहिल्यानंतर त्यांना आपण त्र्यंबकेश्वर येथे या माणसाला पाहिल्याचे लक्षात आले आणि इथेच धनंजयचं नशीब फळफळलं

धनंजय प्रभुणे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूच्या भूमिकेत

हेही वाचा - पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीला ४ वर्षांची सक्तमजुरी

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंसारखा हुबेहुब चेहरा असणाऱ्या धनंजय यांना राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दाक्षिणात्य सिनेमात चंद्राबाबूंची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. त्यामुळे येथील कलाकारांनाही सिनेमात काम करण्यासाठी झगडावे लागते. मात्र, असे असतना धनंजय यांना त्यांच्या चेहरा आणि कलागुणांमुळे ही भूमिका मिळाली आहे. तर, सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात कलाकाराच्या रुपाने आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

प्रभूणे हे डोंबिवली येथे सुरूवातीपासूनच रिक्षाचालक म्हणून कार्यरत होते. मात्र कलाकार असल्यामुळे पाककला करणे ही त्यांची आवड होती. त्यामुळे पाककलेचा आधार घेत उत्तम प्रकारे चरितार्थ चालावा यासाठी त्यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आपला छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करत असताना त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी अनेक भाविक येत असे. यातील बहुतांश भाविक हे हैदराबाद येथील असल्याचे धनंजय सांगतात. असेच एकदा जेवण वाढत असताना एका भाविकाने चंद्राबाबू नायडू सारखे दिसत असल्याने व्हिडिओ काढून घेतला.

हेही वाचा - राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा बेपत्ता..? तक्रार दाखल

हा व्हिडिओ हैदराबादमध्ये समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्द झाला. त्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ कोणाचा आहे, हे शोधून देईल त्याला १ लाख रुपयाचे बक्षीस देईन असे राम गोपाल वर्मा यांने ट्विट केले होते. हे ट्विट आणि व्हिडिओ हैदराबाद येथील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने पाहिल्यानंतर त्यांना आपण त्र्यंबकेश्वर येथे या माणसाला पाहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर राम गोपाळ वर्मा यांना तसे ट्विट करत धनंजय यांची ओळख पटल्याचे सांगत नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे ते राहत असल्याचे सांगितले. राम गोपाल वर्मा यांच्या चमूने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर लक्ष्मी एनटीआर या सिनेमासाठी तरूणपणीच्या चंद्राबाबूची भूमिका साकरण्यासाठी धनंजय यांना सांगितले. मात्र, त्यानंतर धनंजय चंद्राबाबूंच्या तरुणपणीच्या पात्रासाठी योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यावेळी त्यांनी तुम्हाला नंतर कळवतो असे सांगितले.

मध्यंतरीच्या काळात आपल्या आजारी असणाऱ्या पत्नीची सेवा करण्यासाठी धनंजय यांनी पुन्हा डोंबिवली येथे येऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. याचवेळी राम गोपाल वर्मा यांचा पुन्हा फोन आल्याचे त्यांनी कुंटुंबीयांना सांगितल्यानंतर कोणाचाच विश्वास बसेना. इतकेच नव्हे तर त्यांनी ताबडतोब हैदराबादची तिकीटे पाठवून दिल्याने धनंजय यांनी जाण्याची तयारी केली. जवळपास ४ महिने धनंजय हैदराबाद येथे राहिले. यावेळी पहिल्या महिन्यात त्यांना तेलगू भाषेचा लहेजा, अभिनयाचे प्रशिक्षण बाहुबलीमध्ये काम करणाऱ्या हरिश्चंद्र यांच्याकडून देण्यात आले.

हेही वाचा - ठाण्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त, अजित पवारांच्या प्रतिमेला जोड्याने मारले

'कम्मा राज्यम लो कडप्पा रेडलु' असे या चित्रपटाचे नाव आहे. या तेलगू चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. त्यावेळी पहिलाच सीन चित्रीकरण करताक्षणी ओके झाल्याने सर्वांनाच आनंद झाल्याचे धनंजय सांगतात. इतकेच नव्हे तर राम गोपाल वर्मा यांनी माझे आयुष्य प्रकाशझोतात आणण्यासाठी महत्त्वाचा रोल केला असल्याचे धनंजय यांनी सांगितले. सिनेमाचे चित्रीकरण हैदराबाद येथे झाले असून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि आजी मुख्यमंत्री वाय. एस आर रेड्डी यांची राजकीय कारकिर्द या चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून जवळपास १० लाख लोकांनी हा पाहिला असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचा २७ नोव्हेंबरला प्रिमीयर शो होणार असून २९ नोव्हेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे चित्रपट तेलगू भाषेत असल्याने धनंजय यांना हिंदी भाषेत तेलगू वाक्य लिहून देण्यासाठी एक मराठी मुलगी त्यांना मदत करत होती. त्यानुसार ते वाक्य पाठ करत असल्याचे त्यांनी अवर्जून नमुद केले. या चित्रपटात धनंजय यांचा मुलगा विनायक याने देखील रावडी मुलाची छोटीशी भूमिका निभावली आहे. तर, धनंजय यांच्या आजरी असणाऱ्या पत्नीनेही पतीने खुप कष्ट केल्याचे सांगितले. धनंजय प्रभूणे हे ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांचे चुलत बंधू असून तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वाई या गावचे आहेत. गेल्या ३५ वर्षापासून ते डोंबिवली येथे राहत असून सध्या ते येथे रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत.

हेही वाचा - ठाण्यात पोलीस बंदोबस्त तैनात

Intro:kit 319Body:व्हायरल व्हिडीओमुळे रिक्षाचालकाच फळफळलं नशीब ; 'तो' दिसला चक्क माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूच्या भूमिकेत

ठाणे : कोणाचं नशीब कसे फळफळेल हे सांगू शकत नाही. मात्र एका रिक्षाचालकाच नशीब सोशलमिडीयावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे असं काही फळफळलं कि, तो रातोरात चंदेरी दुनियेत प्रकाशझोतात येऊन त्याने चक्क राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दक्षिणात्य चित्रपटात माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूचीं भूमिका साकारली आहे. धनंजय प्रभुणे असे रिक्षा चालकाचे नाव असून ते कुटंबासह डोंबिवलीत राहतात.
विशेष म्हणजे धनंजयने त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आपला छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला. त्यावेळी जेवण वाढत असताना एका भाविकाने चंद्राबाबु नायडू सारखे दिसत असल्याने व्हिडीओ काढून घेतला. हा व्हिडीओ हैद्राबादमध्ये समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्द झाला. त्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडीओ कोणाचा आहे. हे शोधून देईल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देईन असे राम गोपाल वर्मा यांने ट्विटरवर टाकले. हे ट्विट आणि व्हिडीओ हैद्राबाद येथील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने पाहिल्यानंतर त्यांना आपण त्र्यंबकेश्वर येथे या माणसाला पाहिल्याचे लक्षात आले. इथंच धनंजयच नशीब फळफळलं

हैद्राबादचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडूंसारखा हुबेहुब चेहरा असणारे धनंजय यांना राम गोपाल वर्मा दिग्दर्शित दाक्षिणात्य सिनेमात चंद्राबाबु नायडू यांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. दाक्षिणात्य सिनेमामध्ये काम करण्यासाठी अनेक कलाकार उत्सुक असतात. त्यामुळे येथील कलाकारांनाही सिनेमात काम करण्यासाठी झगडावे लागते. मात्र असे असतना धनंजय यांना त्यांच्या चेहरा आणि कलागुणांमुळे ही भूमिका मिळाली असून सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली शहराच्या शिरपेचात कलाकाराच्या रुपाने आणखी एक तुरा रोवला गेला आहे
प्रभूणे हे डोंबिवली येथे सुरूवातीपासूनच रिक्षाचालक म्हणून कार्यरत होते. मात्र कलाकार असल्यामुळे पाककला करणे ही त्यांची आवड होती. त्यामुळे याच पाककलेचा आधार घेत उत्तम प्रकारे चरितार्थ चालावा यासाठी त्यांनी नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराजवळ आपला छोटासा हॉटेल व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय करत असताना त्र्यंबकेश्वर येथे नारायण नागबळी सारखे विधी करण्यासाठी अनेक भाविक येत असे. यातील बहुतांश भाविक हे हैद्राबाद येथील असल्याचे धनंजय सांगतात. असेच एकदा जेवण वाढत असताना एका भाविकाने चंद्राबाबु नायडू सारखे दिसत असल्याने व्हिडीओ काढून घेतला. हा व्हिडीओ हैद्राबादमध्ये समाजमाध्यमांद्वारे प्रसिध्द झाला. त्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडीओ कोणाचा आहे हे शोधून देईल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देईन असे राम गोपाल वर्मा यांने ट्विटरवर टाकले. हे ट्विट आणि व्हिडीओ हैद्राबाद येथील एका वृत्तवाहिनीच्या संपादकाने पाहिल्यानंतर त्यांना आपण त्र्यंबकेश्वर येथे या माणसाला पाहिल्याचे लक्षात आले. त्यानंतर राम गोपाळ वर्मा यांना तसे ट्विट करत धनंजय यांची ओळख पटल्याचे सांगत नाशिक येथील त्र्यंबकेश्वर येथे ते राहत असल्याचे सांगितले. राम गोपाल वर्मा यांच्या चमुने त्यांचा शोध घेतला. त्यानंतर लक्ष्मी एनटीआर या सिनेमासाठी तरूणपणीच्या चंद्राबाबुची भूमिका साकरण्यासाठी धनंजय यांना सांगितले. मात्र त्यानंतर धनंजय चंद्राबाबुंच्या तरूणपणीच्या पात्रासाठी योग्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यावेळी त्यांनी तुम्हाला नंतर कळवतो असे सांगितले.
मध्यंतरीच्या काळात आपल्या आजारी असणाऱ्या पत्नीची सेवा करण्यासाठी धनंजय यांनी पुन्हा डोंबिवली येथे येऊन रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. याचवेळी राम गोपाल वर्मा यांचा पुन्हा फोन आल्याचे त्यांनी कुंटुंबियांना सांगितल्यानंतर कोणाचाच विश्वास बसेना. इतकेच नव्हे तर त्यांनी ताबडतोब हैद्राबादची तिकीटे पाठवून दिल्याने धनंजय यांनी जाण्याची तयारी केली. जवळपास चार महिने धनंजय हैद्राबाद येथे राहिले. यावेळी पहिल्या महिन्यात त्यांना तेलगु भाषेचा लहेजा, अभिनयाचे प्रशिक्षण बाहुबली मध्ये काम करणाºया रायला हरिश्चंद्र यांच्याकडून देण्यात आले.
कम्मा राज्यम लो कडप्पा रेडलु असे या चित्रपटाचे नाव आहे. या तेलगु चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले. त्यावेळी पहिलाच सीन चित्रीकरण करताक्षणी ओके झाल्याने सर्वांनाच आनंद झाल्याचे धनंजय सांगतात. इतकेच नव्हे तर राम गोपाल वर्मा यांनी माझे आयुष्य प्रकाशझोतात आणण्यासाठी महत्त्वाचा रोल केला असल्याचे धनंजय यांनी जय महाराष्ट शी बोलताना सांगितले. सिनेमाचे चित्रीकरण हैद्राबाद येथे झाले असून माजी मुख्यमंत्री चंद्राबाबु नायडू आणि आजी मुख्यमंत्री वाय. एस आर रेड्डी यांची राजकीय कारकिर्द या चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून जवळपास १० लाख लोकांनी हा पाहिला असल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाचा २७ नोव्हेंबर रोजी प्रिमीयर शो होणार असून २९ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपट तेलगु भाषेत असल्याने धनंजय यांना हिंदी भाषेत तेलगु वाक्य लिहून देण्यासाठी एक मराठी मुलगी त्यांना मदत करत होती. त्यानुसार ते वाक्य पाठ करत असल्याचे त्यांनी अवर्जन नमुद केले. या चित्रपटात धनंजय यांचा मुलगा विनायक याने देखील रावडी मुलाची छोटीशी भूमिका निभावली आहे. तर धनंजय यांच्या आजरी असणाऱ्या पत्नीनेही पतीने खुप कष्ट केल्याचे सांगितले.

विशेष म्हणजे धनंजय प्रभूणे हे ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांचे चुलत बंधू आहेत. तर्कतिर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या वाई या गावचे असून गेल्या ३५ वर्षापासून डोंबिवली येथे राहत असून सध्या ते डोंबिवली येथे रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहेत.

Conclusion:riksha chalk
Last Updated : Nov 24, 2019, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.