ETV Bharat / state

दातिवली बालवाडीची नवीन इमारत बांधण्याचा महापालिकेचा निर्णय, मनसेच्या आंदोलनाला यश - agitation

या आंदोलनाची दखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने जुन्या बालवाडीच्या दुरूस्तीचे काम थांबवून आता नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनविसेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

आंदोलन करतान मनसेचे कार्यकर्ते
author img

By

Published : Mar 15, 2019, 11:27 PM IST

ठाणे - दिवा, दातिवलीतील ठाणे महापालिका शाळा क्र. ९४ मधील बालवाडी ही दुरुस्तीच्या नावाखाली शाळा मंदिरात भरत होती. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची दखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने जुन्या बालवाडीच्या दुरूस्तीचे काम थांबवून आता नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनविसेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

thane
धोकादायक झालेली इमारत

ठाणे महानगरपालिका शाळा क्र ९४ मधील बालवाडी क्र २२ चा वर्ग हा दुरुस्तीच्या नावाखाली मंदिरात भरवण्यात येत होता. यामुळे ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली १३ फेब्रुवारीला शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंग वाजवून भजन आंदोलन केले होते. दुरुस्ती करून वर्ग लवकरात लवकर योग्य जागी भरावा, अशी मागणी करण्यात आली होती.

या मागणीची गंभीर दाखल घेत धोकादायक बालवाडी तोडून तेथे नवीन बालवाडी इमारत बांधण्यात येईल, असे लेखी आश्वासन महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी अरुण घोसाळकर यांना दिले. यावेळी हे आंदोलन यशस्वी झाल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.

Intro:दातिवली येथील बालवाडीची नवीन इमारत बांधण्याचा महापालिकेचा निर्णय
मनविसेच्या आंदोलनानंतर महापालिका प्रशासनांचा निर्णयBody:

ठाण्यातील दिवा,दातिवली येथील ठाणे महापालिका शाळा क्र ९४ मधील बालवाडी दुरुस्तीच्या नावाखाली शाळा मंदिरात भरत असल्याने याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भजन आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनाची दाखल घेऊन ठाणे महापालिका प्रशासनाने बालवाडी तोडून नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला असल्याने मनविसेने केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
ठाणे महानगरपालिका शाळा क्र ९४ मधील बालवाडी क्र २२ चा वर्ग दुरुस्तीच्या नावाखाली मंदिरात भरवण्यात येत असल्याने ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली 13 फेब्रुवारीला ठाण्यातील म.न.वि.से. च्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंडळ कार्यालयाबाहेर टाळ-मृदुंग वाजवून भजन आंदोलन केले होते. दुरुस्त करून वर्ग लवकरात लवकर योग्य जागी भरावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची गंभीर दाखल घेत धोकादायक बालवाडी तोडून तेथे नवीन तळ + पहिला मजला बालवाडी इमारत बांधण्यात येईल असे लेखी आश्वासन महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ अधिकाऱ्यांनी म.न.वि.से. ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर यांना दिल्याने मनसेच्या आंदोलन यशस्वी आल्याचे घोसाळकर यांनी सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.