ETV Bharat / state

Thane Accident News: भिवंडी वाडा महामार्गावरील अपघातात दोन तरुण गंभीर, रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात झाल्याचा आरोप

Thane Accident News भिवंडी-वाडा या महामार्गाची अवस्था अक्षरश: दयनीय झाली आहे. पाळखणे गावच्या हद्दीत दोन तरुणांचा अपघात (Accident) झाला आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Thane Accident News
खड्डयांमुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 8:30 PM IST

खड्डयांमुळे दुचाकीवरील दोन तरुणांचा अपघात

ठाणे : Thane Accident News भिवंडी-वाडा महामार्गावरील पाळखणे गावच्या हद्दीत दोन तरुण दुचाकीने भिवंडीच्या दिशेने येत असताना, त्यांना रस्त्यात पडलेल्या खड्डयाचा अंदाज न आल्याने अपघात झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोघेही तरुण गंभीर झाले आहेत. आकाश जाधव (रा.दुगाड) व सूरज हिंगाडे (रा.भिनार) अशी अपघातात जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.

दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक : अपघातात गंभीर जखमी झालेले दोघे मित्र रक्षाबंधनच्या दिवशी रात्री साडेबारा वाजता भिवंडी-वाडा महामार्गावरून घरी परतत असताना, त्यांची दुचाकी खड्यात आढळून अपघात झाला आहे. या घटनेची माहिती श्रमजीवी संघटनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील नागरिक व गणेशपुरी पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सध्याही या दोन्ही तरुणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून समोर आले.

तात्पुरती खड्डयांवर मलमपट्टी : खळबळजनक बाब म्हणजे या अपघाताला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभागासह ठेकेदार जिजाऊ संघटना असल्याचा आरोप, श्रमजीवीचे प्रमोद पवार यांनी व्हायरल व्हिडीओच्या माध्यामातून केला आहे. तसेच त्यांनी सांगितलं आहे की, रस्त्यात पडलेल्या खड्डयांवर ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शनने माती, दगड टाकून तात्पुरती मलमपट्टी केल्याने हे माती व दगड वर आले आहेत. त्यामुळे असे अनेक अपघात या महामार्गावर घडत आहेत.

लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करून कोटी रुपये उकळून थुकपट्टी लावली जात असून, याबाबत आमदार, खासदार सुद्धा मौन बाळगून गप्प आहेत- श्रमजीवीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार

लोकांच्या जीवाचा खेळ सुरू : जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीनं ठेका घेऊन या रस्त्यावर गतवर्षी फक्त साडे तेरा किमी रस्त्यासाठी तब्बल ३० कोटी रुपये काढले असून, पूर्ण रस्त्यासाठी ५९ कोटी काढले आहेत. तसेच याअगोदर, सुप्रीम कंपनीनं ठेका घेऊन टोल वसूल करून रस्ता दुरुस्त करत नसल्यानं, श्रमजीवीने संघर्ष करून टोल बंद केला, पण सद्यस्थितीतील ठेकेदार हे सुप्रीम कंपनी सारखेच जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. हा खेळ कधी थांबेल ? राजकीय सहानुभूती मिळवत शासनाच्या पैशांची लूट आणि लोकांच्या जीवाचा खेळ सुरू आहे.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा : ठेकेदारावर आणि सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, ही जनतेची क्रूर थट्टा आहे. जे एवढे सगळे वास्तव बघून पण ठेकेदाराचे समर्थन करत आहेत. त्यांना जनता कधीच माफ करणार नाही. यासह ठेकेदार जिजाऊ कन्स्ट्रक्शनने भिवंडी - वाडा महामार्गावरील रस्त्यावर पडलेल्या खड्डयांची तात्काळ दुरुस्ती न केल्यास त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा श्रमजीवीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेले दोन्ही तरुण गेल्या १२ तासापासून बेशुद्ध अवस्थेत असल्याने, ते दोघेही पोलिसांना जबाब नोंदवण्याच्या स्थितीत नाहीत. तर अद्यापी या अपघाताची नोंद गणेशपुरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Bihar Accident : बिहारमध्ये कंटेनर आणि स्कॉर्पिओची जोरदार धडक, ७ जणांचा जागीच मृत्यू
  2. Nashik Accident News : कामावर जात असताना काळाचा घाला; नाशकात खड्ड्याने घेतला कामगाराचा बळी, पाहा व्हिडिओ
  3. Palamu Accident : पलामूमध्ये कारने १२ जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.