ETV Bharat / state

Thane Chain Snatcher Death : पोलीस पकडण्यासाठी आल्यानंतर इराणी चोरट्याचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांसह नागरीकांनी घातला गोंधळ...

चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस आणि चोरट्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर चोरटा पळून गेला. काही वेळानंतर चोराचा मृत्यू (Chain Snatcher Death) झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. ज्यामध्ये नातेवाईकांसह नागरीकांनी पोलिसांवर आरोप करत गोंधळ घातला होता.

Chain Snatcher Death
Chain Snatcher Death
author img

By

Published : Feb 11, 2022, 12:07 PM IST

ठाणे : एका अट्टल चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला पकडण्यासाठी पोलीस पथक गेले असता, पोलीस पथक आणि चोरटा यांच्यात झटापट झाली. त्यानंतर चोरटा आपल्या भावाच्या ताब्यात असताना, त्याचा अचानक मृत्यू (Death of a chain snatching thief) झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा येथील इराणी नागरीकांच्या वस्तीत घडली आहे. मात्र या घटनेनंतर कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत, गोंधळ घालून मृतदेह घेऊन जाण्यास अटकाव केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. सादिक कंबल जाफरी (वय ३०)असे मृत चोरट्याचे (Sadiq Jafri dead thief) नाव आहे.

नातेवाईकांसह नागरीकांनी घातला गोंधळ

पोलिसांच्या तावडीतून पळाला अन..

मृतक सादिक कंबल जाफरी हा अट्टल चेन स्नॅचिंग करणारा चोरटा (Sadiq Jaffrey chain snatching thief) असून त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. हा चोरटा गुरुवारी रात्रीच्या सुमारास पिराणी पाडा भागातील इराणी वस्ती असलेल्या आपल्या घरी आला होता. अशी माहिती स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत (Senior Police Inspector Sheetal Raut) यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी त्यास ताब्यात घेण्याची कारवाई केली असता, पोलीस व चोरट्या मध्ये झटापट होऊन तो पोलिसांच्या तावडीतून पळाला आणि भावाच्या घरात शिरला. मात्र त्या ठिकाणी काही वेळाने त्याचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसे मृतदेह घेऊन जाण्यास पोलिसांना अटकाव केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जमावाला पांगवून पोलिसांनी मृतदेह घेतला ताब्यात -

चोरट्याच्या मृत्यूनंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमून पोलिसांना विरोध करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या घेऊन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त व मोठा पोलीस फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी दाखल होत, जमवाला पांगवून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून कुटुंबियांच्या मागणीनुसार, मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालय काल रात्री उशिरा रवाना केला. तर मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्यानंतर उचित कारवाई करण्यात येईल, अशी माहिती भिवंडी पोलीस (Bhiwandi Police Station) उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.