ETV Bharat / state

बाळ्या मामांचा सेनेच्या सदस्य पदासह जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा - ठाणे जिप बातमी

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे बडेनेते माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज (दि. 29 मे) शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे.

बाळू मामा
बाळू मामा
author img

By

Published : May 29, 2021, 3:20 PM IST

ठाणे - जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात दबदबा असलेले शिवसेनेचे बडेनेते माजी जिल्हा संपर्कप्रमुख तथा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज (दि. 29 मे) शिवसेना पक्ष सदस्यत्वासह ठाणे जिल्हा परिषद सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दोन वर्षापासून मामाकडे पक्षश्रेष्ठींनी केले दुर्लक्ष

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांना शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी कारवाई करत तब्बल दोन वर्षे त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपविली नव्हती. शिवसेनेच्या या दुर्लक्षित धोरणामुळे बाळ्या मामा यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी होती. अखेर आपले वैयक्तीक कारण पुढे करत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी शिवसेना म सदस्यपदासहा आपला जिल्हा परिषदेच्या सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला.

बाळ्या मामा काँग्रेसच्या वाटेवर

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बाळ्या मामा यांच्या घरी आले होते. तेव्हापासूनच बाळ्या मामा हे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती . त्यातच आता बाळ्या मामा यांनी आपला राजीनामा दिल्यामुळे ते काँग्रेस सोबत घरोबा करणार असल्याची चर्चा सध्या तालुक्यासह जिल्ह्यात सुरू आहे. त्याचबरोबर आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच बाळ्या मामा यांनी हा राजीनामा दिला असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठी खिंडार पडणार असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - ठाण्यात तीन चिल्लरचोर गजाआड; १ लाख १२ हजारांची चिल्लर केली जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.