ETV Bharat / state

शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटलांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही - सुरेश म्हात्रे - bjp

युतीला माझा कधीच विरोध नव्हता, आजही नाही. मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता, शिवसैनिकांची आर्थिक आणि राजकीय कोंडी केली होती, अशा कपिल पाटलांचे मी कधीच समर्थन करणार नाही, असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.

शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटलांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही - सुरेश म्हात्रे
author img

By

Published : Apr 12, 2019, 9:33 PM IST

ठाणे - भिवंडी लोकसभा मतदारसंघातून युतीच्या विरोधात अर्ज दाखल केल्याने सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. मात्र, त्यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. यानंतर, शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटील यांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात म्हात्रे यांनी युतीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होताच शिवसेना पक्षश्रेष्ठींनी तडकाफडकी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावरून निलंबनाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून म्हात्रे यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला होता. अखेर पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज माघारी घेत असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी सांगितले.

शिवसेनेचा ध्वज जाळणाऱ्या कपिल पाटलांचा प्रचार करायला मी काही षंढ शिवसैनिक नाही - सुरेश म्हात्रे
विशेष म्हणजे खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. युतीला माझा कधीच विरोध नव्हता, आजही नाही. मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता, शिवसैनिकांची आर्थिक आणि राजकीय कोंडी केली होती, अशा कपिल पाटलांचे मी कधीच समर्थन करणार नाही, असे सुरेश म्हात्रे यांनी म्हटले आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:शिवसेनेचा ध्वज जाणारा कपल पाटलांचा प्रचार करायला मी षंढ शिवसैनिक नाही ,, बाळ्या मामा

ठाणे :- भिवंडी लोकसभा मतदारसंघ युतीच्या विरोधात दाखल केल्याने शिवसेनेतून हकालपट्टी केलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा यांनी आज उमेदवारी माघारी घेतली, मात्र शिवसेनेचा भगवा ध्वज आपल्या गावात जाणाऱ्या कपिल पाटील यांच्या बद्दल शिवसेनेतील इतर नेत्यांना सहानुभूती असेल मात्र मी षंढ शिवसैनिक नाही, अशी खरमरीत टीका करून भाजप खासदार कपिल पाटील यांना कायम विरोध राहणार असल्याचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी पुन्हा एकदा जारी केले,

शिवसेनेला संपविण्याची भाषा करणारे खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात शिवसेना पक्षश्रेष्ठींचा आदेशाला न जुमानता बाळ्या मामा यांनी युतीच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र बाळ्या मामा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या दबावाखाली शिवसेना पक्षश्रेष्ठींनी तडकाफडकी शिवसेनेच्या ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख पदावरून निलंबनाची कारवाई केल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींकडून बाळ्या मामा यांची मनधरणी करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु झाला होता, अखेर पक्ष पक्षश्रेष्ठीच्या आग्रहाखातर आपण उमेदवारी अर्ज माघार घेत असल्याचे सुरेश म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,

विशेष म्हणजे खासदार कपिल पाटील यांना आपला विरोध होता म्हणूनच आपण त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत युतीला माझा कदापि विरोध नव्हता आणि आजही नाही मात्र ज्या कपिल पाटलांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता या कपिल पाटील यांनी शिवसैनिकांची आर्थिक व राजकीय कोंडी केली होती, तसेच शिवसैनिकांवर खोट्या केसेस दाखल केल्या , महत्त्वाचे मध्ये कपिल पाटलांनी शिवसेनेचा भगवा ध्वज जाळला त्या कपिल पाटलांचा कट्टर शिवसैनिक म्हणून मी कदापि समर्थन करणार नाही अशी खरमरीत प्रतिक्रिया सुरेश म्हात्रे यांनी अर्ज मागे घेताना पत्रकारांना दिली,

Conclusion:बाळ्या मामा चा उमेदवारी अर्ज मागे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.