ETV Bharat / state

'विद्यमान सरकार हे फसवा-फसवीचे सरकार' - माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख न्यूज

निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले, अशी टीका माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

सुभाष देशमुख
सुभाष देशमुख
author img

By

Published : Jan 5, 2020, 1:39 PM IST

ठाणे - महाविकास आघाडीचे सरकार हे फसवा-फसवीचे सरकार आहे. आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांचीच फसवणूक केल्याची जोरदार टीका, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. भाजप नेते सीताराम राणे यांनी ठाण्यात भरवलेल्या मालवणी महोत्सवाला देशमुख यांनी भेट दिली.

माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सरकारवर टीका केली

निवडणुकीत मतदारांनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिला होता. मात्र, शिवसेनेने विश्वासघात करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची भरपाई देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने घूमजाव केले. सत्तेत येऊन दोन महिने उलटले तरी हे सरकार अजून अस्थिर असल्याची टीका देशमुख यांनी केली.

हेही वाचा - सत्ता गेल्याने विरोधकांची अवस्था पाण्याबाहेर पडलेल्या माशा सारखी, बाळासाहेब थोरातांचा टोला

मागील अनेक वर्ष ठाण्यात मालवणी महोत्सव भरवणाऱ्या सीताराम राणेंचे त्यांनी कौतुक केले. हा महोत्सव म्हणजे एक चळवळ असून यामुळे अनेक छोट्या उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. देशमुखांनी महोत्सवातील अनेक खाद्यपदार्थांच्या दुकांनाना भेट दिली आणि तेथील रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि भाजपचे अनेक कार्यकर्ते हजर होते.

Intro:विद्यमान सरकार हे फसवं सरकार माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची टीका सीताराम राणे यांचे केले तोंडभर कौतुकBody:
महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे फसवं सरकार असून आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांचीच फसवणूक केल्याची जोरदार टीका आज माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. भाजप नेते सीताराम राणे यांनी ठाण्यात भरवलेल्या मालवणी महोत्सवाला आज त्यांनी भेट दिली. मतदारांनी शिवसेना भाजप युतीच्या बाजूने स्पष्ट कौल दिलेला असताना, सेनेने विश्वासघात करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले यावर त्यांनी जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची भरपाई देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारने घुमजाव केला वर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे ते म्हणाले. निकाल लागून दोन महिने उलटले तरी हे सरकार अजून अस्थिर असल्याची टीका त्यांनी केली. सीताराम राणे है गेली अनेक वर्षे हा मालवणी महोत्सव ठाण्यात भरवतायत त्याचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. हा महोत्सव म्हणजे एक चळवळ असून यामुळे अनेक छोट्या उद्योजकांना एक हक्काचे व्यासपीठ मिळायचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी महोत्सवातील अनेक खाद्यपदार्थांच्या स्टॉल ना भेट दिली व तेथील रुचकर पदार्थांचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत ठाण्याचे आमदार संजय केळकर आणि भाजप चे अनेक कार्यकर्ते हजर होते.
BYTE - सुभाष देशमुख (माजी सहकार मंत्री)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.