ठाणे - आज (शुक्रवारी) मकर संक्रातीनिमित्त कल्याणच्या नूतन विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी 15 बाय 18 फूटाचा भव्य पतंग साकारला आहे. 'कोरोना गो बॅक' असा संदेश देणारा हा पतंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला आहे.
'1927 साली सायमन गो बॅकची आठवण'
विद्यार्थ्यांकडून हा पतंग तयार करुन घेणारे कला शिक्षक श्रीहरी पावळे यांनी कोरोना काळात शाळा बंद होत्या. त्या सुरु करण्यात आल्या पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने शाळा बंद आहे. प्रत्यक्ष शिक्षणात आणि ऑनलाइन शिक्षणात फरक असतो. शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा पतंग तयार केला आहे. इंग्रजाच्या विरोधात स्वातंत्र्याचा लढा देत असताना 1927 साली सायमन गो बॅक करण्यासाठी अशा प्रकारचा भव्य पतंग तयार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर 2022 मध्ये कोरोना गो बॅक करण्यासाठी हा पतंग तयार करण्यात आला असल्याचे सांगितले.