ETV Bharat / state

Government Medicine in Garbage : शासकीय औषधाचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, श्रमजीवी संघटनेमुळे प्रकार आला समोर

भिवंडी तालुक्यातील अंबाडी - दिघाशी रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासकीय औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला आहे. ही औषधे म्हणजे शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणाऱ्या फॉलीक असिडच्या गोळ्या आहेत. याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि सुनील लोणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी वज्रेश्वरी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत अवगत केले. पंचनामा करत औषधे शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यानी ताब्यात घेतली.

Government Medicine in Garbage
शासकीय औषधाचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात
author img

By

Published : Mar 7, 2023, 5:22 PM IST

शासकीय औषधाचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात

ठाणे : शासनाचा अनिमिया मुक्त भारत अभियानांतर्गत बालक सदृढ आणि अनीमिया मुक्त जन्माला यावे म्हणून लोह आणि फॉलीक ॲसिड तसेच पोषण आहार देण्याचे उपक्रम जाहिरातीत पाहायला मिळतात. प्रत्यक्ष ग्राउंड रियालिटी मात्र भयावह आहे. असाच प्रत्यय आज अंबाडीत येथे आला. अंबाडी गावातील नाझिब धुरू या तरुणाने प्रमोद पवार यांना माहिती देऊन रस्त्याच्या कडेला औषधे पडलेले असल्याचे सांगितले. श्रमजीवींचे पवार यांनी घटनास्थळ गाठत शासकीय अधिकाऱ्यांना पोलिसांना ही गोष्ट लक्षात आणून दिली.

औषधे शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यानी ताब्यात घेतली : भिवंडी तालुक्यातील अंबाडी - दिघाशी रस्त्यालगत असलेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शासकीय औषधांचा साठा अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडला आहे. ही औषधे म्हणजे शासनाच्या आरोग्य विभागातून देण्यात येणाऱ्या फॉलीक असिडच्या गोळ्या आहेत. याबाबत माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे प्रमोद पवार आणि सुनील लोणे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी वज्रेश्वरी प्रा.आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधव कावळे आणि गणेशपुरी पोलिसांना याबाबत अवगत केले. पंचनामा करत औषधे शासकीय वैद्यकिय अधिकाऱ्यानी ताब्यात घेतली.

या गोळ्या हिंदुस्थान लॅबोरेटरीमध्ये तयार होतात : गोळ्या ज्या ठिकाणी पडलेल्या होत्या हे अंतर अंबाडी ग्रामीण रूग्णालय ( सध्या फक्त OPD सेवा) पासून केवळ ५०० मीटर अंतरावर आहेत. या गोळ्या हिंदुस्थान लॅबोरेटरी पालघर या ठिकाणी तयार होऊन शासनाकडे आल्यानंतर त्या संबंधित जिल्हा शल्य चिकित्सक तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र इत्यादी विभागात दिले जाते.

आता या गोळ्या नक्की कुणाच्या? : अंबाडी ग्रामीण रुग्णालयाल की, अजून कुठ याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. याबाबात श्रमजीवी संघटनेने सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली असल्याचे प्रमोद पवार यांनी सांगितले. प्रमोद पवार यांच्यासोबत यावेळी, श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील लोणे ,कल्पेश जाधव रुपेश जाधव , निखिल जाधव, कल्पेश पाटिल, रूपेश पाटील, नाजिब धूरू, अनास मेमन, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ माधव कावळे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : Bombay High Court: बार्टी प्रशिक्षणासाठी पात्र असलेले उमेदवार भरतीपासून वंचित; 16 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.