ठाणे : नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने (State excise duty team seized liquor stock) सापळा रचून (State excise duty team trap) मारलेल्या छापेमारीत विविध मद्याच्या ब्रॅण्डच्या शेकडो बॉक्स सह वाहतूक करणाऱ्या वाहनासह ४३ लाख १ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत (seized liquor stock worth 25.60 lakhs) केला. तर पथकाने वाहतूक करणाऱ्या दोघा आरोपीना अटक केली. (Latest news from Thane) (Thane Crime)
ही आहेत अटकेतील आरोपींची नावे- राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथकाला मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार पथकाने केलेल्या कारवाईत पथकाने आरोपी गणेश कौतिक सौन्नी (वय ३८ वर्षे, रा. ता. भुसावळ, जि. जळगाव), आरोपी निलेश सुरेश अस्वार (वय २८ वर्षे, रा. ता. भुसावळ, जि. जळगाव) यांना अटक करून त्यांच्याकडील टाटा कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात दादरा नगर हवेली आणि दमण मद्य आढळले.
जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील - भरारी पथकाने अँटीब्युटिक ५ बॉक्स , मॅजिक मुमेंट वोडका १० बॉक्स रॉयल चेलेंजचे १५ बॉक्स आणि २० बॉक्स, रॉकफोर्ड क्लासिक १० बॉक्स, ब्लेंडर प्राईड व्हिस्कीचे ५ बॉक्स, ऑफीस चॉईस ब्ल्यू व्हिस्कीचे १० बॉक्स आणि ऑफीस चॉईस ब्ल्यू व्हिस्कीचे २० बॉक्स, रॉयल स्पेशल प्रीमीयम व्हिस्कीचे २० बॉक्स, रॉयल स्पेशल प्रीमीयम व्हिस्कीचे ३० बॉक्स, ऑल सिजन व्हिस्कीचे १५ बॉक्स, रॉयल स्टॅग बॅरेल सिलेक्ट व्हिस्कीचे ५ बॉक्स, सिल्हर व्हिस्कीचे १० बॉक्स, सिग्नेचर व्हिस्कीचे १० बॉक्स, डिएसपी ब्लॅक व्हिस्कीचे १५ बॉक्स, डिएसपी ब्लॅक व्हिस्कीचे ३० बॉक्स, टूबर्ग बिअरचे ५० बॉक्स, टाटा कंपनीचा टाटाचा टेम्पो एक मोबाईल पुठयाचे ब्रॅण्ड बॉक्स, असा ४३ लाख १ हजार ७०० रुपयांचा एकूण मुद्देमाल भरारी पथकाने जप्त केला. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक निरीक्षक एन.एन. राणे, दुय्यम निरीक्षक .गोविंद पाटील, दुय्यम निरीक्षक आर. एस. राणे, वाहन चालक गणेश पाटील, आर. एस. पाटील, . एस. के. वाडेकर, इत्यादीचा सहभाग होता.