ETV Bharat / state

Bus Truck Accident : माळशेज घाटात भरधाव बस व ट्रकची समोरासमोर धडक; 15 प्रवासी गंभीर जखमी - माळशेज घाटात बस ट्रकला अपघात

माळशेज घाटात एसटी बस व ट्रकची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात 15 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर टोकावडे येथील रु्ग्णालयात उपचार सुरू आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : May 29, 2023, 5:53 PM IST

Updated : May 29, 2023, 5:59 PM IST

ठाणे : मुरबाड तालुक्यातील कल्याण नगर राष्ट्रीय मार्गावर असलेल्या माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रक यामध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एस टी बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र टोकावडे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

बस-ट्रकची धडक - पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार MH.20. BL. 2809 ही एस टी बस नगरकडून कल्याणकडे जात होती. तर मुरबाड तालुक्यातील टोकावडेवरुन MH. 14. HG. 4501 हा ट्रक जुन्नरच्या दिशेने जात होता. सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रकमध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांना दुखापत झाली. तर ट्रकचा समोरील भाग चक्कचूर झाला होता.

जखमींना रुग्णालयात केले दाखल - घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कल्याण नगर माहार्माग पोलिस व टोकावडे पोलिसाचे पथक पोहचले. त्यानंतर जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी प्रवाशाचे नावे समजू शकली नाही. या अपघाताची नोंद टोकावडे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचा पुढील तपास टोकावडे पोलिस स्टेशनचे एपीआय सुनिल संसारे करत आहेत.

रविवारी झाला होता आणखी एक अपघात - दुचाकीवरून बहिणीला सोडून घरी परतताना वाहनाच्या धडकेत भावाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई नाशिक महामार्गावर घडली होती. बहिणीला सोडून ठाण्याहून मानकोली येथील राहत्या घरी दुचाकीने परतत असताना दुचाकीस्वार भावाला अज्ञात वाहनाने धडक दिली असता, झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास मुंबई - नाशिक वाहिनीवरील बॉम्बे धाब्यासमोर घडली आहे.दीपक बबनराव रेठरेकर (३६ रा.मानकोली) असे अपघातात मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. Truck Accident Amaravati: डुलकी लागली अन् भरधाव ट्रक भिंत तोडून शिरला विद्यापीठाच्या आवारात
  2. Thane Accident: ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने, दोघांचा जागीच मृत्यू

Last Updated : May 29, 2023, 5:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.