ETV Bharat / state

Yeoor Hill Station येऊर पर्यटन स्थळ संपुष्टात; निसर्गरम्य येऊरला काँक्रिटीकरणाची कीड, पहाटेपर्यंत भरते मद्यपींची जत्रा

ठाणे परिसरात निसर्गरम्य असलेल्या येऊर पर्यटनस्थळाला ( Drunk People Rush In Yeoor Hill Station) काँक्रिटीकरणाची कीड लागली आहे. येऊर पर्यटन स्थळ ( Yeoor Hill Station Thane ) परिसरात रात्रभर मद्यपींचा धुमाकूळ असल्याने पर्यटक या परिसरात फिरकत नसल्याचे दिसून येत आहे. काँक्रिटीकरण आणि मद्यपींच्या धुमाकुळामुळे येथील वन्यजिवांवरही विपरित परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

Yeoor Hill Station
येऊर पर्यटन स्थळ
author img

By

Published : Dec 14, 2022, 5:31 PM IST

Updated : Dec 14, 2022, 6:17 PM IST

ठाणे - शहराच्या नकाशात जरी येऊर पर्यटन स्थळाच्या ( Yeoor Hill Station In Thane ) यादीत असले, तरीही प्रत्यक्षात येऊरच्या निसर्गरम्य वातावरणातून पर्यटन संपुष्ठात आलेले आहे. येऊर या हिल स्टेशनला काँक्रिटीकरणाची कीड लागली असून ढाबे आणि विनापरवाना मद्य पुरवणाऱ्या छोट्या-मोठ्या हॉटेल्सची येथे भरमार आहे. यामुळेच हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ मद्यपींचा अड्डा ( Drunk People Rush In Yeoor Hill Station At Thane ) झाल्याची तक्रार आता स्थानिक करत आहेत. मात्र येऊर हिल स्टेशनवर ( Hill Station In Thane ) सुरु असलेली बेकायदेशीर हॉटेल्स, ढाबे आणि मद्यपींची पहाटेपर्यंतची जत्रा सुरूच आहे.

येऊर पर्यटन स्थळ संपुष्टात; निसर्गरम्य येऊरला काँक्रिटीकरणाची कीड, पहाटेपर्यंत भरते मद्यपींची जत्रा

ठाण्याचे हिल स्टेशन अशी ख्याती येऊरची ओळख आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ( Sanjay Gandhi National Park ) म्हणून होती. मात्र आता या ठिकाणाला मध्यपींचा अड्डा असे संबोधले जाते. येथील धाबे, हॉटेल्स आणि मद्यपींची जत्रा बंद होऊ शकली नाही. चक्क लॉकडाऊनमध्येही येऊर सुरूच होते. आता येऊर नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीत आहे. ढाबे, हॉटेल्स आणि मद्यापींची जत्रा अशी येऊरची ओळख झालेली आहे. याच येऊरला काँक्रिटीकरणाची कीडही लागलेली आहे. हिरव्यागार येऊरमध्ये हिरवळ नाहीशी होत आहे. तर काँक्रीटीकरण वाढत चालले आहे. चक्क क्रिकेटची मैदाने टर्फ बंदिस्त बनवून ती भाड्याने देण्याचा फंडा सुरु असल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. मात्र यावर कुठल्याही प्रकारे आजतागायत कारवाई करण्यात आलेली नाही.

Yeoor Hill Station
येऊर पर्यटन स्थळ

पार्यावरण प्रेमी परागंदा, रोज भरते मद्यपींची जत्रा येऊर हिल स्टेशन ( Yeoor Hill Station In Thane ) हे ठाण्याचे महाबळेश्वर आहे. पर्यावरण प्रेमी या ठिकाणी फेरफटका मारीत होते. काळानुसार येऊरच्या हिरवळीवर हॉटेल, ढाबे अन् ढाब्यात मद्यपींची जत्रा सुरु झाल्यानंतर पर्यटन स्थळ असलेल्या येऊरकडे पर्यटकांनी ( Tourist Not Come In Yeoor ) आणि पर्यावरण प्रेमींनी पाठ फिरवली. येऊरमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर ढाबे आणि हॉटेल्स सोबतच विनापरवाना पुरविण्यात येणारे मद्य याकडे वर्तकनगर पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचेही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप सुज्ञ नागरिक करत आहेत. तर शांत आणि निसर्गरम्य येऊरमधील कलकलाट आणि धुडगूस बंद होईल का? असा प्रश्न समाजसेवक यांच्यासह नागरिक उपस्थित करीत आहेत.

Yeoor Hill Station
तपासणी करताना पोलीस

अवैध हॉटेल्स धाबे आणि अहोरात्र मद्य पुरवठा येऊरमध्ये काही हॉटेल्स कायदेशीर आहेत. इतर ढाबे हे बेकायदेशीरपणे चालत आहेत. ढाब्यांवर परवाना नसतानाही मद्य पुरविण्यात येते. याकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळेच येऊरचा धुडगूस सर्वज्ञात आहे. पण याला पायबंद बसावा अशी मागणी स्थानिक करत आहेत.

Yeoor Hill Station
तपासणी करताना पोलीस

अवैध बांधकामे काँक्रिटीकरणामुळे हिरवळ नष्ट होण्याची आहे भीती ठाण्याचे लौकिक येऊर आहे. निसर्गरम्य वातावरण, हिरवळ पक्षांचा कलकलाट, पण आता येऊरची नैसर्गिकता हरवत चालली आहे. येऊरलाही काँक्रिटीकरणाची कीड लागली असून येणाऱ्या काळात हिरवळ नष्ट होण्याची भीती आहे. येऊरमध्ये चक्क बंदिस्त क्रिकेटची मैदाने, टर्फ आहेत. ही काँक्रिटीकरणाची कीड नाही काय? असा सवाल नागरिक करत आहेत.

वन्यजीवांवर झाला परिणाम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील ( Sanjay Gandhi National Park ) सुरू असलेल्या या सर्व अवैध प्रकारांमुळे वन्यजीवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. हे वन्यजीव आता दिसने देखील बंद झाले आहे. हे वन्यजीव येऊर परिसरामध्ये मागील अनेक दशकांपासून दिसत होते.

Last Updated : Dec 14, 2022, 6:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.