ETV Bharat / state

तृतीय पंथीयांसाठी 'शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे' या नाविन्यपूर्ण उपक्रमाला कल्याणमधून सुरुवात

तृतीयपंथीयांना शिक्षणाच्या माध्यमातून सबल करण्यासाठी व त्यांच्याकडे बघण्याची समाजाची मानसीकता बदलण्यासाठीच्या दृष्टिकोणातून 'शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे' या उपक्रमाला कल्याण येथे सुरुवात झाली आहे. तृतीयपंथीयांना 'center for distance education sndt women university' या माध्यमातून शिक्षणाबद्दलची पूर्ण माहिती या उपक्रमात देण्यात आली आहे.

शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या कार्यक्रमाला उपस्थित तृतीयपंथी
author img

By

Published : Jun 27, 2019, 12:02 AM IST

ठाणे - तृतीयपंथी म्हटले की, समाज आजही त्यांना वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र, तृतीयपंथीयांकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलावी म्हणून अनेक तृतीयपंथी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात शासकीय हुद्यावर नोकरी करीत आहेत. तरी देखील त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तृतीयपंथीयांसाठी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याण येथे सुरुवात झाली आहे. स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जात आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्येही शेकडो तृतीयपंथी उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे.

special-education-training-programs-starts-for-transgender-in-thane-district
शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या कार्यक्रमाला उपस्थित तृतीयपंथी

देशात 2014 ला तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळाला, तेव्हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात सर्वात आधी मोठ्या प्रमाणात येथील तृतीयपंथीयांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली होती. कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल भागात शेकडो तृतीयपंथी राहतात. त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वरदा महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांनी पुढाकार घेतला. संस्थेच्या अध्यक्षा वरदाताई जोशी यांनी आज पत्रीपूल येथील नगरसेविकेच्या छतावर 30 ते 40 तृतीयपंथीयांना 'center for distance education sndt women university' या माध्यमातून शिक्षणाबद्दलची पूर्ण माहिती या उपक्रमात देण्यात आली. महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये धोरण व तरदूत करून ठेवली आहे, समाज आपल्याला कसा कमी लेखतो, त्यामुळे आपण पण यावर उपाय म्हणून शिक्षण घेऊ आणि सर्व समाजाला दाखवून देऊ की, आम्हाला समाज एक वेगळ्या नजरेने बघतो, तो बघू नये आता आम्हीही सन्मानाने जगू, असे मार्गदर्शन वरदा जोशी आणि रेखा चौधरी यांनी केले.

शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाबद्दल बोलताना वरदा जोशी व इतर

दरम्यान, हा उपक्रम आता शनिवारी व रविवारी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या घराच्या छतावर राबविण्यात येणार आहे. तीन तास चालणाऱ्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तृतीयपंथाना खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. तर पहिल्याच दिवशी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याणमधून सुरुवात झाल्याने उपस्थितीत तृतीयपंथी यांनी आयोजकांचे आभार मानले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:(विशेष) तृतीय पंथीयांसाठी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याणातून सुरुवात

ठाणे :- तृतीयपंथी म्हटलं की , समाज आजही त्यांना वेगळ्या नजरेने पाहतो. मात्र तृतीयपंथ्याकडे समाजाची बघण्याची मानसीकता बदलावी म्हणून अनेक तृतीयपंथ्यानी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात शासकीय हुद्यावर नोकऱ्या करीत आहेत, तरी देखील त्यांच्याकडे समाजाच्या बघ्याचा दृष्टीकोन बदलत नसल्याचे दिसून येत आहे, त्यातच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने तृतीयपंथीयांसाठी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याण आज सुरुवात झाली आहे स्थानिक नगरसेविका रेखा चौधरी यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविल्या जात आहे विशेष नंगे कल्याणातही शेकडो तृतीयपंथी उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे,

देशात 2014ला तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळाला तेव्हा ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात सर्वात आधी मोठ्या प्रमाणात येथील तृतीयपंथीयांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली होती कल्याण पूर्वेकडील पत्रीपूल भागात शेकडो तृतीयपंथी राहात असून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी वर्धा महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या मदतीने स्थानिक नगरसेविका रेखाताई चौधरी यांनी पुढाकार घेऊन संस्थेच्या अध्यक्षा वरदाताई जोशी यांनी आज पत्रीपूल येथील नगरसेविकेच्या टेरेस वर 30 ते 40 तृतीयपंथीयांना आपण कसे, center for distance education sndt w university या माध्यमातून शिक्षण पूर्ण केले जाते, याची माहिती या उपक्रमात देण्यात असून महाराष्ट्र शासनाने त्यामध्ये धोरण व तरदूत करून ठेवली आहे, आपला समाज कसा कमी लेखतो, त्यामुळे आपल्याला पण यावर उपाय म्हणून शिक्षण घेऊन सर्व समाजाला दाखवून देऊ या की, आम्हाला समाज एक वेगळ्या नजरेने बघतो, तो बघू नये आता आम्हीही सन्मानाने जगू, असे मार्गदर्शन वरदा जोशी आणि वर्षाताई यांनी केले,
दरम्यान, हा उपक्रम शनिवारी व रविवारी नगरसेविका रेखा चौधरी यांच्या घराच्या टेरिसवर राबविण्यात येणार असून तीन तास चालणाऱ्या या उपक्रमात सहभागी होणाऱ्या तृतीयपंथाना खानपानची व्यवस्थाही करण्यात आली आहे, तर पहिल्याच दिवशी शिक्षण आणि शिक्षणाचे फायदे या उपक्रमाला कल्याणा तुन सुरवात झाल्याने उपस्थितीत तृतीय पंथानी आयोजकांचे आभार मानले,
5 बाईट आणि व्हिज्युअल ftp
foldar -- tha, kalyan kinnar 26.6.19

Conclusion:विशेष बातमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.