ठाणे - एकीकडे लॉक डाऊन सुरू असताना जीवनावश्यक वस्तुंची चढ्या भावाने विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. मात्र, या प्रकाराला रोखण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नसल्यामुळे दुकानदार पैसे कमवण्याची संधी साधत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनचा फायदा घेत ठाण्यामधील नौपाडा, एमजी रोड येथील 'मीना स्टोर्स'मध्ये नागरिकांच्या अडचणीचा फायदा उचलून स्थानिक रहिवाशांना चढ्या भावाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री केली जात होती. अशाप्रकारच्या बऱ्याच तक्रारी नागरिकांकडून येऊ लागल्यानंतर काही समाजसेविंनी त्याची दखल घेत दुकानदाराला योग्य ती समज दिली. मात्र, अशाप्रकारच्या समस्या लॉक डाऊन काळात उद्भवू लागल्यामुळे पोलिसांनी हा प्रकार रोखण्यास काही उपाययोजना केल्यास असले प्रकार आटोक्यात येतील, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.